हर घर तिरंगा ; राष्ट्रध्वज योग्य वेळी उतरवणे ही आपली जबाबदारी -शिरीषकुमार दगडोबा लोणकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 16, 2022

हर घर तिरंगा ; राष्ट्रध्वज योग्य वेळी उतरवणे ही आपली जबाबदारी -शिरीषकुमार दगडोबा लोणकर

 


        खर तर हो पोस्ट करताना खूप वाईट वाटतंय. आज दि 16/08/2022 ला सुट्टी असल्यामुळे थोडं उशिरा सकाळी 7 वाजता उठलो आणि ब्रश करत टेरिसवर गेलो तर गल्लीतील जवळपास सर्व घरावर तिरंगा ध्वज फडकत असताना दिसत होता. खर तर राष्ट्रध्वज कालच सायंकाळी उतरवणं अपेक्षित होत पण आज सकाळपर्यंत ध्वज तसेच होते, पाहून खूप वाईट वाटलं आणि ठरवलं की चला आपण स्वतः जाऊन ध्वज सन्मानपूर्वक काढून ठेवावेत आणि घराबाहेर पडलो. आज दिवसभर फिरून जवळपास 250 ते 300 घरावरील ध्वज सन्मानपूर्वक उतरवून घेतले. खूप वाईट वाटलं की खूप लोकांना ध्वज उतरवून घ्यायचाय हे माहीतच न्हवत.त्यामुळं जिथे ध्वज दिसेल तिथे जाऊन उतरवून घ्यावा या विचाराने बाहेर पडलोय. आपल्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळायला.

 कारण राष्ट्रध्वज फडकवन हे जसे अभिमानच तसच तो योग्य वेळी उतरवणं हेही आपलंच कर्तव्य. या कामी माझे मित्र राहुल कुंडालवाडीकर व गणेश भालेराव सर यांनी मोलाची मदत केली. वाईट एका गोष्टीच वाटत आहे की मी दिवसभर प्रयत्न करूनही  शहरातील सर्व ध्वज उतरवू शकलो नाही. Plz तुम्हाला त्या घरावरील, वाहनावरील राष्ट्रध्वज उतरवून घ्या ही विनंती

 शेवटी मनात एक विचार येतोय हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून आपण राष्ट्रध्वजाचा मान केला की अपमान, हाच का आपला अमृत मोहत्सव  आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपण प्रगती केली की अधोगती


 तुम्ही पण यात सहभागी व्हा व आपल्या राष्ट्रध्वजाचा मान ठेवा.     

    

एक सामान्य शिक्षक

-शिरीषकुमार दगडोबा लोणकर

जि . प . कें . प्रा . शा . पाथरड

ता . हदगाव जि . नांदेड

 mob.- 8830828104

 @ 9561877966


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News