किनवट : श्री संत भगवानबाबा यांचा 126 वा जन्मोत्सव सोहळा येथील गजानन बाबा मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पूण अभिवादन केले. ह. भ. प.नारायण महाराज यांचे आशीर्वाद घेतले. येथे संत भगवानबाबा जयंती निमित्त कीर्तन सोहळा आयोजित केला होता.
याप्रसंगी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते निवृत्त मुख्याध्यापक नागनाथ कराड, प्रकाश मुंडे, श्याम मुंडे, नागनाथ दराडे,आणि बालाजी बाबुराव मुंडे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक सत्कार यांचा करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अनिरुद्ध केंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, आत्माराम मुंडे, बालाजी पाटील मुटकुटे, शिवा आंधळे, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे उपस्थित होते.





No comments:
Post a Comment