औसा (लातूर) : येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प. पू. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव गिरीश भैय्या पाटील व संस्थेचे अध्यक्ष प. पू. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या व या दिनाचे महत्त्व समजून सांगितले. तसेच महाविद्यालयाच्या गौरवात्मक वाटचालीचे कौतुक केले. महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय रेकॉर्डच्या माध्यमातून मानांकन प्राप्त केल्याबद्दल, अध्यक्ष व माननीय यांनी प्राचार्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सुदृढ भारत व सशक्त भारत हा नारा घेऊन, लातूर ते औसा दौड करणारे मच्छिंद्रनाथ महाराज व इतर तीन जणांच्या रॅलीचे स्वागत अध्यक्ष , सचिव व संस्थेचे विश्वस्त तसेच प्राचार्य एनसीसी कॅडेट , प्राध्यापक यांनी स्वागत केले. त्यांना औसा मोड येथे सलामी देऊन महाविद्यालयामध्ये सन्मानपूर्वक आणले.
संस्थेचे सचिव गिरीश भैय्या पाटील यांनी मच्छिंद्रनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार केला. परमपूज्य सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांना काशी पिठाच्या वतीने दिलेल्या कीर्तनकार या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बेटकर एम. एम. यांनी सत्कार केला. दैनिक सकाळचे बातमीदार श्रीमान बोरफळे यांच्या हस्ते मच्छिंद्रनाथ महाराज यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणाऱ्या भितीपत्रकाचे विमोचन अध्यक्ष, सचिव, विश्वस्त रवींद्र महाराज यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी एनसीसी सी सर्टिफिकेट मिळालेल्या स्वामी कॅडेटचा त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भितीपत्रक तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार, अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्ष, सचिव व विश्वस्त यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रेवणसिद्धप्पा उटगे , उपाध्यक्ष बसवराजआप्पा वळसंगे, सहसचिव सुभाषआप्पा मुक्ता, कोषाध्यक्ष, भानुदासआप्पा डोके, सुधाकर पाटील, रवींद्रनाथ महाराज, राजशेखर बिराजदार, प्राध्यापक मोहम्मद हनीफ जिंदाबाद विश्वस्त, शेषराव पाटील, सिद्धराम आप्पा मिटकरी, उपप्राचार्य डॉ. एस. डी मिसाळ, पर्यवेक्षक रविंद्र कारंजे, प्रवीण उटगे , महाविद्यालयीन अध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी, एनसीसी कॅडेट व एनएसएस स्वयंसेवक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.





No comments:
Post a Comment