भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण #तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 16, 2022

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण #तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  


 

किनवट : भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी किनवट येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील सर्व कार्यालयासह तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांच्या आयोजनाने उत्साहात साजरा करण्यात आला.

         भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वतंत्र्याच्या वर्धापन दिनाचे हे ध्वजारोहण असल्याने या समारंभास तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व नागरिक यांची उपस्थिती होती .    



        ध्वजारोहणानंतर संगीत विशारद गायिका आम्रपाली वाठोरे व त्यांच्या विद्यार्थिनी वैष्णवी एम्बडवार , गायत्री चव्हाण , आकांक्षा कांबळे , ऋषिका फरास  यांनी देशभक्ती गीते गाईली. निल अंबर ठमके व  उत्कर्षा मनोहर पाटील या चिमुकल्यांनी इंग्रजीत भाषण केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 


         स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त किनवट व माहूर तालुक्यातील तलावातील गाळ काढण्याच्या कामात भरीव योगदान दिल्याबद्दल कविताबाई जयवंतराव आदिवासी सेवाभावी संस्था, गोकुंद्याचे जयवंतराव बोबले, ज्ञानेश्वर मुंडे व माहूर येथील मारोती रेकुलवार यांचा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी प्रशस्ती पत्र देऊन गौरव केला. 


क्रीडा शिक्षक संदीप यशीमोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिक सादर केले.  


पावसाच्या रिमझिम सरी येतांना सुध्दा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने पालक , विद्यार्थी , शिक्षक , पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांची तोबा गर्दी झाली होती.  


        तालुका प्रशासकीय इमारतीत तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, पंचायत समिती किनवट येथे गट विकास अधिकारी तथा प्रशासक सुभाष धनवे, गट साधन केंद्र येथे गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , एकात्मिक बाल विकास  कार्यालयात प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड व किनवट नगर परिषदेत नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचे हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण झाले.


            ग्रामस्तरावर सरपंच , प्रशासक व मुख्याध्यापक यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. घरोघरी राष्ट्रध्वज लावल्याने सर्वांमध्ये देशभक्तीची भावना संचारली होती. प्रत्येक गावात विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीत गावकरीही सहभागी झाले होते. सर्वच शाळा - महविद्यालयांत अनेक उपक्रम राबविण्यात आले, विद्यार्थ्यांच्या फॅन्सीड्रेस सह विविध स्पर्धा घेण्यात आल्या व बक्षिस वितरणही करण्यात आले. एकंदरीत शहर व  तालुक्यात "स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News