भर पावसात आदिवासी ढेमसा व दंडार नृत्यात निघाली गणेशपूर शाळेची स्वातंत्र्या दिनाची फेरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 15, 2022

भर पावसात आदिवासी ढेमसा व दंडार नृत्यात निघाली गणेशपूर शाळेची स्वातंत्र्या दिनाची फेरी



किनवट : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त तालुक्यातील कमठाला ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर (जुने) येथे भर पावसात आदिवासी ढेमसा व दंडार नृत्यात ग्रामस्थांच्या सहभागाने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी.

           स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रम  आयोजित करण्यात आले आहेत. यानुषंगाने जि.प.प्रा.शा.गणेशपूर (जुने ) येथेही  विविध उपक्रम राबवून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. गावातील सर्वच नागरीक भर पावसातही उत्साहाने सहभागी झाले होते.   रांगोळी, पताके, तिनरंगीफुगे लावून सजविलेल्या, सुशोभित केलेल्या व देशभक्ती गीतांच्या देशभक्तीमय उत्साही वातावरणाने फुलून गेलेल्या शाळेत   गावातील लहान मोठी सर्व लोक जमा झाले.   


         राष्ट्रपुरुषांच्या प्रतीमांचे पुजन करून मुख्याध्यापक प्रवीण पिल्लेवार यांच्याहस्ते राष्ट्री ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून  प्रभात फेरी काढण्यासाठी गावातील आदिवासी ढेमसा व दंडार नृत्य ढोल ताशे घेऊन भर पावसात  नवयुवक सज्ज झाले. माजी सरपंच तुकाजी आत्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मेश्राम, ज्येष्ठ नागरिक चंपत आत्राम यांनी आदिवासी ढेमसा व दंडार नृत्याचे आयोजन केले होते. गावातील सर्व युवक, युवती, महिला व पुरुषांसह विद्यार्थ्यां बरोबर रॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात  तिरंगी फुगे व राष्ट्रध्वज दिला होता. गावातील प्रमुख मार्गाने फिरून झाल्यानंतर ह्या सुंदर रॅलीचा समारोप शाळेत झाला. शाळेत विविध कार्यक्रमांची विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन सुरूवात केली. अनेक विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्लिश मध्ये भाषणे केली.  मराठी व हिंदी देश भक्तीगीते गायली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. चित्र रंगभरण स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, बालसभा, संगीत खुर्ची , भाषणे व  देश भक्ती गीत गायन या स्पर्धांमधील यशवंतांनात बक्षीस वितरण करण्यात आले. 

       शेवटी विद्यार्थ्यांच्या पालकांना व गावातील नागरिकांना शाळेत तयार करण्यात आलेल्या रोप वाटीकेतील रोपांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना बिस्कीट व चाॅकलेट देण्यात आले.  गावातील 100% घरावर तिरंगी झेंडे लावण्यात आले. गावातील युवकांचे नेहमी शाळेला सहकार्य असते त्यामुळे जि.प.प्रा.शाळागणेशपूर (जुने) शाळेकडून व्हॉलीबाॅल व जाळी त्यांचं शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे म्हणून भेट दिली. श्री पिल्लेवार यांनी सूत्रसंचालन केले.  सह शिक्षिका उर्मिला परभणकर  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News