अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे मुलींच्या हस्ते ध्वजारोहण #वाजेगाव बीटचा उपक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 15, 2022

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे मुलींच्या हस्ते ध्वजारोहण #वाजेगाव बीटचा उपक्रम

 



नांदेड : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण भारतभरात अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना अक्षर परिवार नावाने परिचित असणाऱ्या वाजेगाव बीटमध्ये देखील अतिशय नेटक्या, देखण्या कार्यक्रमांची रेलचेल स्वातंत्र्य दिनानिमित्त दिसून आली.

       13 ऑगस्ट पासून सुरू असणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेची अंमलबजावणी प्रत्येक गावात करण्यात आली. नांदेड जिल्ह्याचा विशेष उपक्रम दहा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम देखील बीटमधील शंभर टक्के शाळेत यशस्वीपणे राबविण्यात आला. त्याद्वारे नांदेड जिल्ह्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. तसेच सर्व शाळा आणि गावांमध्ये विशाल मानवी साखळी, प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. इतर रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सर्वच शाळांमध्ये आयोजित करण्यात आले होते.

 


  बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वाजेगाव बीट मधील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दरवर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जात असतो. शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील सर्वात हुशार, उपक्रमशील विद्यार्थिनीच्या हस्ते वाजेगाव बीटमधील प्रत्येक शाळेत ध्वजारोहण करण्यात येते. यावेळीदेखील तीच परंपरा कायम राखत सर्वात हुशार मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी सर्व खाजगी शाळांमध्येही मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुलीच्या आई वडिलांनादेखील यात सामावून घेत त्यांना त्यांच्या मुलीसोबत या अत्यंत अभिमानाच्या क्षणाला अनुभवण्याची संधी देण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी उच्च श्रेणी मुख्याध्यापक बाबुराव जाधव, सटवाजी माचनवार, माधव घोरबांड, लक्ष्मी गायकवाड तसेच इतर मुख्याध्यापक दत्तप्रसाद पांडागळे, बशीर पठाण, रामराव देशमुख, संगमनाथ पांचाळ, अक्षय ढोके, बेबिसरोजा परबत, संगीता कदम, मनीषा माळवतकर, अरुणा कलेपवार आदींनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News