दिव्यांगांना मोफत बस प्रवासाची सवलत द्यावी ; दिव्यांग मित्र मंडळाची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 24, 2022

दिव्यांगांना मोफत बस प्रवासाची सवलत द्यावी ; दिव्यांग मित्र मंडळाची मागणी

  


नांदेड : सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस गाड्य़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या निर्णया प्रमाणेच दिव्यांगांना सुध्धा बस प्रवासाची सवलत द्यावी ; अशी मागणी दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळाने केली आहे.  

         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस गाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबदल सरकाराचे अभिनंदन ! पण ज्या दिव्यांगाना चालता येत नाही, जगात काय चालले ते दिसत नाही, जगात काय चालले ते ऐकु येत नाही, शासनास आमचे म्हणणे सांगण्यासाठी बोलता येत नाही, अशा दिव्यांगाना व सोबतीला बस प्रवासात मोफत बस पासची सेवा  बाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी  आपल्या मंत्रीमंडळात दिव्यांगाना मोफत बस प्रवासाची मोफत सुविधा, देऊन  दिव्यांगाना शासनाने आधार द्यावा, अशी मांगणी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर , जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे, राजुभाऊ शेरकुरवार, अनिल रामदिनवार, विठ्ठल बेलकर ईत्यादिंनी केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News