प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांचा जागतिक विक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 24, 2022

प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांचा जागतिक विक्रम

 



औसा (लातूर) : कोरोनाच्या टाळेबंदीत 455 वेबिनार आयोजित केल्याच्या जागतिक विक्रमा बद्दल नोंदीचे प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

        येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एम.बेटकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातून 455 वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनार मालिकेत भारतातील व भारताबाहेरील महिला साधन व्यक्तींनी विविध विषयावर व्याख्यान दिले. महिला सशक्तिकरण व महिला सन्मान हा उद्देश ठेवून, सदरची वेबिनार मालिका सातत्याने चालू होती. त्यांच्या या वेबिनार मालिकेची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये करण्यात आली. या नोंदीचे प्रमाणपत्र व मेडल महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभात एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधी  रेखा सिंह व  नरेंद्र सिंह तसेच संस्था अध्यक्ष ह.भ.प. प.पू. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते सन्मानपुर्वक देण्यात आले.   

        यावेळी संस्थेचे सचिव गिरीष शेषेराव पाटील, प्रमुख पाहुणे माजी महापौर  दीपक सुळ, स्वा.रा.ती.म.विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ.मल्लिकार्जून करजगी, संस्थेचे कोष्याध्यक्ष भानुदासप्पा डोके, विश्वस्त प्रा.एम.झेड.अलुरे, समन्वयक  सुधाकर पाटील, विश्वस्त ॲड. अरविंद कुलकर्णी,  राजशेखर बिराजदार,  सिद्रामप्पा मिटकरी हे मंचावर उपस्थित होते. 

           अशाप्रकारे वेबिनार मालिकेचा जागतिक विक्रम करणारे हे मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. हा जागतिक विक्रम म्हणजे लातूर पॅटर्न प्रमाणे आपल्या लातूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविणारा असून त्‍यामुळे विविध शिक्षण संस्था, लातूर जिल्हा प्राचार्य संघटना, प्राध्यापक संघटना यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

        यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण व डॉ.सुरेंद्र शिंदे व डॉ.राजाभाऊ कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी एन.सी.सी.कॅडेट, एन.एस.एस. स्वयंसेवक, महाविद्यालयाचे विद्यार्थी , माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.सुधीर गरड यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News