रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार -शिक्षणमंत्री दीपक केसरकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, August 25, 2022

रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार -शिक्षणमंत्री दीपक केसरकर

 



 मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल  अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.


            राज्यातील रात्रशाळांकरिता सर्वांकष धोरण निश्चित करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकाच्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक असे धोरण ठरवून, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यात येईल. तसेच या शाळांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.


            दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणात विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


              या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर ,कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News