गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी : मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, August 25, 2022

गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी : मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी

 


मुंंबई : यंदाचा गणेशोत्स उत्साहात साजरा करण्यासाठी गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेच्या वतीने शिक्षण विभागाकडे  केली आहे.

           दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.  

त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात कोणत्याही, परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करावे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी शिक्षण उपसंचालक  संदीप संगवे यांना निवेदन दिले.

       गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक , विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागातील असल्यामुळे गावी जात असतात. शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ सर्व शाळांना उत्सव काळात सुट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शाळांना निर्देश देण्यात येतील असे सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News