भोकर तालुक्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या गावांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिसाळ याची भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 26, 2022

भोकर तालुक्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या गावांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिसाळ याची भेट




नांदेड  : हागणदारी मुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यात गावस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानास अधिक गती देण्यात यत आहे. त्या अनुषंगाने आज भोकर तालुक्यातील गावांना पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी गट विकास अधिकारी अमित राठोड, स्वच्छता तज्ज्ञ विशाल कदम, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे यांची यावेळी उपस्थिती होती.

     सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात भोकर तालुक्यात यापूर्वीच्या सात व चालू वर्षात 27 असे एकूण 34 गावांचा समावेश आहे. सात गावांची कामे प्रगतीपथावर असून 27 गावांचे डीपीआर करण्यात येत आहेत. 

    भोकर तालुक्यातील खरबी, भोसी, कोळगाव व हाडोळी गावांना भेट देऊन आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिसाळ यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची पाहणी केली.



     हागणदारी मुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यात गाव स्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच शाश्वत स्वच्छता, प्लास्टिक संकलन आणि त्याचे व्यवस्थापन आदी विषयावर काम केले जाणार आहे. अशा गावांना ओडीएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्त अधिक नामांकन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News