आ. भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त १५० रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया "मेघे सावंगी येथून यशस्वी शस्त्रक्रिया करून परतलेल्या रूग्णांची आस्थेवाईक विचारपुस..!" - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 26, 2022

आ. भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त १५० रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया "मेघे सावंगी येथून यशस्वी शस्त्रक्रिया करून परतलेल्या रूग्णांची आस्थेवाईक विचारपुस..!"

 


किनवट : आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोगनिदान शिबीरातील तब्बल १५० रूग्णांवर मेघे सावंगी येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

     आज रोजी शस्त्रक्रिया होवून परतलेल्या सर्व रूग्णांनी त्यांच्या  येथील लोकार्पण या  जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांची आस्थेवाईक व आपुलकीने  विचारपुस केल्याने शस्त्रक्रिया होवून परतलेल्या रूग्णांच्या चेहर्‍यावर केराम यांच्या समाजकार्याची कृतज्ञता दिसत होती. 

       किनवट -माहूर तालुक्याचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांचा दि. १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. परंतू १४ ऑगस्ट रोजी लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष  विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने वाढदिवसानिमित्त 'बडेजाव' पणाचे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. यावेळी सामाजिक बांधिलकीचा वसा जपतांना केवळ 'सर्व रोगनिदान' शिबीराचे आयोजन केले होते. यात सर्व रूग्णांची तपासणी व आवश्यक असलेल्या रुग्णांच्या आजारावर शस्त्रक्रिया ही मोफत ठेवण्यात आली होती. दरम्यान मोतीबिंदू या नेत्रविकाराचे ७० रूग्ण तसेच इतर आजार असे एकूण १५० रूग्णांवर मेघे सावंगी येथील रूग्णालयात मोफत व यशस्वी शस्त्रक्रिया तसेच औषधोपचार करून रूग्णांना आज गावाकडे आणण्यात आले.

       यावेळी लोकार्पण या जनसंपर्क कार्यालयात  सर्व रूग्णांची किनवट नगर परिषदचे अध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, भाजपा जिल्हा चिटणीस ऍड. प्रतिक केराम तसेच आमदार यांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांनी  आस्थेवाईक विचारपूस करून त्यांना विश्रांती व योग्य काळजी घेण्याबाबतची विंनती केली. 

      यावेळी सर्व रुग्णांची विशेष काळजी  घेतल्या बद्दलआरोग्य सेवक राजू सिरपुरे  यांचे आभार मानले. तर या शिबीराच्या पुढील टप्प्यात मधुमेह व कॅन्सरसह इतर विविध आजाराने ग्रस्त असलेल्या तब्बल ७०० रूग्णांवर मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News