भोकर येथे बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 28, 2022

भोकर येथे बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

 


भोकर : येथे आज दुपारी ठिक २ वा. बहुजन समाज पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाली.

        आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज शताब्दी वर्षानिमित्त बहुजन समाजाची राजकीय भागीदारी परिषद नांदेड येथे १४ सप्टेंवर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली त्या संदर्भात भोकर विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. फुले , शाहु , आंबेडकर, यांची समता मूलक विचारधारा समाजात रुजवण्यासाठी व राजकर्ती जमात बनविण्यासाठी कांशीराम यांनी तहहयात प्रयत्न केले. त्यांचाच वसा घेऊन येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद , नगर परिषद निवडणूक संदर्भात १४ सप्टेंबर २०२२  रोजी चर्चा करुन वरिष्ट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी भोकर विधानसभा मतदार संघातील बहुजनवादी जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात देवकृपा लॉन्स , छत्रपती चौक, पूर्णा रोड येथे उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले. 

       यावेळी  लक्ष्मण वायवळे ( जिल्हा अध्यक्ष, नांदेड उत्तर ),  प्रा.डॉ. आनंद भालेराव ( नांदेड झोन प्रभारी ),  गणेश राऊत ( जिल्हा महासचिव ),  डॉ. कैलास कानिंदे, रेणापूरकर ( जिल्हा सचिव तथा भोकर विधानसभा प्रभारी अध्यक्ष ),   जयवंत थोरात ( विधानसभा अध्यक्ष ), माधव कंधारे ( कोषाध्यक्ष ), संभाजी चेरेकेवाड, प्रकाश कोकाटे, मारोती चव्हाण व बसपा पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News