याला आयुष्य म्हणावे का? -सुहास दत्ता गायकवाड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 29, 2022

याला आयुष्य म्हणावे का? -सुहास दत्ता गायकवाड

 


पद,पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी लोळण घेतात पायात

बिल गेट ची पत्नी तरीही का घटस्फोट घेते या वयात..? ..


उराशी दगड घेऊन भर उन्हातही झोपी जातो

काळया मातीत घाम गाळणारा बळीराजा कुठे झोपेची गोळी खातो..? ..


एकदा तरी बघा जरा आपल्या आयुष्याचा रोड मॅप 

कुणाचं कुणाशी पटत नाही काय तर म्हणे जनरेशन गॅप..


शिक्षणाने माणूस समृद्ध होतो आम्ही आहोत अजूनही त्या भ्रमात 

उच्च विद्याविभूषकाचे मायबाप मग का असतात वृद्धाश्रमात?.. 


व्यसनी रागीट नवरा त्याला गरिबीची जोड 

तरीही त्याची पत्नी बिचारी करतेच ना तरजोड.? ..


दुःख हलके करतात एकमेकांना भेटून 

एका शिळया भाकरीचा तुकडा खातात सारे जण वाटून ..


पण हल्ली आता इन्स्टंट रिझल्ट चे आले आत्ता दिवस 

देव सुद्धा बदलतात जर पावला नाही नवस..


एकत्रित कुटुंब सांगा कुणाला हवं 

कामाशिवाय वाटतं का आपण कुणाच्या घरी जावं?..


होस्टेल  बोर्डिंगात बालपणीच पाठवलं तो तुम्हाला का वागवणार.? 

जमीन असो की जीवन येथे जे पेरल तेच उगवणार..


काय बरोबर काय चूक मत मांडायची ही सत्ता नाही 

तू बंद घरात मरून पडला वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही..


शिक्षणासाठी मुलं पाठवले  परदेशात, आई सांगे म्हातारा बाप कन्हतो, 

अंत्यविधी उरकून घ्या पैसे पाठवतो असं पोटचा गोळा  म्हणतो..


लेकराला पॉकेट मणी ,बाईक अन् दिली जरी कार 

किती छान झाल असतं तर दिले असते संस्कार.. 


बहुत अच्छे, बहुत खूब! क्या बात है? बहुत बढिया 

येवढ्या ओसंडून  वाहतात प्रतिक्रिया जागृत 24 तास सोशल मीडिया..


सांगा बरं कुणावर या विकृत विचारांचा पगडा नाही 

घर ,बंगला, फ्लॅट असू द्या दार कुणाचे उघडे नाही..


ना तोल ढलतो ना संयम, दुःखातही सावरण्याची आस 

कारण अजूनही या माणसांचा आहे माणुसकीवर विश्वास..


आजारी मायबापांचा विलाज करतात किडूक बिडूक विकून 

पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी नाळ ठेवली टिकून..


असं नाही त्यांच्या घरात नाहीत वाद विवाद, 

पण घटस्फोट आणि वृद्धाश्रम ही नाही शेवटची साद.. 


जळजळीत वाक्य सांगतो तुमचा विश्वास यावर बसणार नाही 

गरीब अडाणी मजुराचे मायबाप वृद्धाश्रमात दिसणार नाही..


आभासी दुनियेची चाले कोरडी कोरडी ख्याली, 

मोबाईलवरच साऱ्या शुभेच्छा मोबाईलवरच श्रद्धांजली..


मिळून मिसळून वागावं आनंदाने छान जगावं, 

आपण सगळी मोठी माणसं मी लहानानं काय सांगावं..  


-सुहास दत्ता गायकवाड (घोटीकर) 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News