डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह फोटो लावणाऱ्या व्यक्तिस अटक करावे : स्वाभिमानी युवा सेनेची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 23, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह फोटो लावणाऱ्या व्यक्तिस अटक करावे : स्वाभिमानी युवा सेनेची मागणी

 


किनवट : इंस्टाग्राम या सोशल मीडियावर gangster_lakhan007 (गँगस्टर लखन) या नावाच्या आयडी धारकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे विद्रूपीकरण, दैवीकरण करून अश्लील फोटो टाकून आक्षेपार्ह मजकूर टाकून आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत या व्यक्तीवर कठोर कारवाई करून त्याचा तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन स्वाभिमानी युवा सेना च्या वतीने आज बुधवारी (ता. 23 ) देण्यात आले.

      जात्यधर्मांध कुविचारी व्यक्ती गँगस्टर लखन याने जातीय द्वेष भावनेतून फोटोवर विद्रूपीकरण, दैवीकरण केले आहे. अशा मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा करुन त्याची आयडी ब्लॉक करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे निवेदन स्वाभिमानी युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखालील देण्यात आले आहे. निवेदनावर स्वाभिमानी युवा सेना तालुका शाखेच्या तालुकाध्यक्षासह उपाध्यक्ष शिलरत्न पाटील, सचिव विपिन पवार, सहसचिव सुगत भरणे, कोषाध्यक्ष सुमित शेंद्रे, शहराध्यक्ष निवेदक कांनिंदे, रवी दिसलवर, सोनू टाक, सुबोध पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार एन. ए . पठाण यांनी निवेदन स्विकारले. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News