ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज आता 2 डिसेंबर 22 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑफलाईन भरण्यास आयोगाची परवानगी -तहसिलदार डॉ. मृणाल जाधव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 2, 2022

ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज आता 2 डिसेंबर 22 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑफलाईन भरण्यास आयोगाची परवानगी -तहसिलदार डॉ. मृणाल जाधव

 



किनवट : वेबासाईट बंद असल्यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता नामनिर्देशनपत्र पारंपारीक पध्दतीने (ऑफलाईन) स्वीकारण्याबाबत  परवानमी दिली आहे. त्यामुळे आता हे अर्ज शुक्रवारी (ता . 2 डिसेंबर 22 )  सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑफलाईन भरता येणार आहेत. असे निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सांगितले.
      
    भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.
         आयोगाने दिनांक ०९/११/२०२२ च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) निवडणूक कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे दिनांक २८/११/२०२२ ते दिनांक ०२ / १२ / २०२२ या कालावधीत संगणक प्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
       ईच्छूक उमेदवार स्त्री-पुरुष संगणकीय प्रणालीद्वारे निवडणूक अर्ज भरण्यासाठी शहरातील ऑनलाईन सेंटरवर दाखल झाले होते. परंतु निवडणूक आयोगाची वेबसाईट सुरु नसल्याने त्यांना रात्र तिथेच कडाक्याच्या थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली. त्यानंतर सकाळीच तहसिल परिसरात तोबा गर्दी झाली होती. तेथील निवडणूक यंत्रणेने ही बाब जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधला. संपूर्ण राज्यभर अशीच स्थिती असल्याने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रने रानिआ/ग्रापनि २०२२/प्र.क्र.८/का-८, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : ०१/१२/२०२२ या निवडणूक प्राथम्य ई-मेलद्वारे आता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोग नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (off line) स्वीकारण्याची परवानगी देत आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ दिनांक ०२/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.तरी त्या अनुषंगाने सर्व निवडणूक अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारीक पध्दतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना द्यावेत. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छूक उमेदवारांना उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. तसेच याबाबतची व्यापक प्रसिध्दी स्थानिक पातळीवर देण्यात यावी. तसेच वरीलप्रमाणे पारंपारीक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO Login मधून भरून घेण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसिलदार यांची राहील. असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार निवडणूक आयोग, महाराष्ट्रचे
उप सचिव, राज्य के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News