सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी सर्व साधारण सभा संपन्न : शिक्षकांना १५% लाभांश जाहीर ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, September 3, 2023

सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी सर्व साधारण सभा संपन्न : शिक्षकांना १५% लाभांश जाहीर !

 मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या शिक्षकांच्या संस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. पाटील चंद्रकांत बाजीराव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ०३/०९/२०२३ रोजी सकाळी ठिक ०९.३० वा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई, मजदूर मंझील, ग. द. आंबेकर मार्ग, परेल, मुंबई - ४०००१२. येथील सभागृहात  यशस्वीपणे पार पडली. 

★ सभेपुढील विषय

१)दिनांक २१/०८/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे.

२) दिनांक ३१ मार्च २०२३ अखेरचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक तपासणी अहवाल वाचून संचालक मंडळाच्या अहवाल साली झालेल्या सभा संमत करणे.

३) संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफा वाटणीस मंजूरी देणे व लाभांश जाहीर करणे.

४)सन २०२२ - २०२३ सालचा वैधानिक लेखापरिक्षण तपासणी अहवाल वाचून त्याची नोंद घेणे.

५)सन २०२३ - २०२४ सालाकरीता अंतर्गत व वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणूक करणे.

६) मागील वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास व सन २०२३-२०२४ सालच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.

७) वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.

८) मागील वर्षाच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.

९) संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे.

१०) सभासद जीवन सुरक्षा ठेव योजना नियमावली बाबत.

११) सभासदांचे व्यवहार होत नसलेली खाती बंद करुन सदर रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवणे बाबत.

१२) संस्थेच्या शाखांना जागा खरेदी करणे बाबत.

१३) संस्थेच्या मालकीच्या शाखांची कार्यालये दुरुस्ती / नुतनीकरण व जागांबाबत.

१४) नविन वेब बेस स्विफ्ट कोअर ६.३ व्हर्जन संगणक प्रणाली, प्रिपेड कार्ड (Debit Card) व मोबाईल ॲप चालू करणे बाबत. 

१५) महाबळेश्वर येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर ( प्रशिक्षण केंद्रास) इमारत उभारण्याबाबत. 

१६) पर्यटन विभागाबाबत.

१७) मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा .


मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने या सभेत उपस्थीत होते. सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्वच ठराव या सभेत मंजूर करण्यात आले. शिक्षक सदस्यांना देण्यात येणारा या वर्षीचा पंधरा टक्के लाभांश शिक्षक दिनी म्हणजे पाच सप्टेंबर रोजी शिक्षकांना मिळेल अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

शिक्षकांसाठी पर्यटन विभागाची स्थापना लवकरच होईल व आरोग्य सुविधेबरोबरच राज्य, देश व विदेशातही शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना पर्यटन करता येईल अशी माहिती संचालिका जयश्री गव्हाणे मँडम यांनी दिली. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीसाठी अनेक योजना कार्यान्वित होणार असून संस्थेचा विस्तार व सभासदांच्या कल्याणकारी योजनांसाठी शिक्षकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन संस्था संचालकांकडून करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News