*“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 8, 2024

*“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन*

 



नांदेड, दि. 8 जुलै :- सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.


राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये डीबीटी प्रणाली द्वारे निधी वितरीत करण्यात येणार आहे.


या योजनेच्या अधिक माहितीसाठी लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण, विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News