किनवट : तालुक्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महविद्यालयातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थी असलेल्या इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा 99.44 टक्के निकाल लागला असून येथील सुयश प्रशांत ठमके यांनी हॉर्टीकल्चर विषयात 200 पैकी 200 गुणांसह 92.67% टक्के गुण घेऊन महाविद्यालय व किनवट-माहुर-हिमायतनगर तालुक्यातून सर्वप्रथम आल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
तसेच बुरकुले सुरज बालाप्रसाद (82.00%) हा व्दितीय, कु.डवरे कोमल माधव हीने ( 80.17% ) गुणांसह महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेतुन उच्च गुण प्राप्त विद्यार्थी : कु.भंडगे स्वाती साहेबराव (80%), कु.तलांडे पायल प्रकाश (80%) कु.हुरदुके अश्विनी गोपाल (79.67%), कु.वानोळे सुरेखा हनमंतु ( 79.17%), वागतकर प्रेम राजेश्वर (79%), कु.ढुमणे प्रतिक्षा परमेश्वर (78.83%), कु.सिडाम पायल देवराव ((78.83%) ), वागतकर अनिकेत नारायण (77.83%), कु.मुंडे कोमल श्रीहरी (77.83%).
मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोकुंदा व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालय कोठारी (चि) येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील एकूण 180 विद्यार्थ्यांपैकी 179 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 22 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 137 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीची गुणवत्ता प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे हॉर्टीकल्चर या विषयात सुध्दा सुयश प्रशांत ठमके या विद्यार्थ्याने 200 पैकी 200 गुण प्राप्त करून दुहेरी यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे या यशवंतात आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळेत प्रवेश या योजनेत प्रविष्ठ झालेले बहुतांशी आदिवासी विद्यार्थी आहेत.
इंग्रजी माध्यमातून बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत केलेली ही नेत्रदीपक कामगिरी निश्चित कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके, सचिव शुभांगीताई ठमके, प्राचार्य शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्यासह सर्वसर्वस्तरातून यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment