शिक्षणात मराठी भाषेचा वापर वाढविणार -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, January 6, 2023

शिक्षणात मराठी भाषेचा वापर वाढविणार -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 


 


मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):- राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तांत्रिक विषयांचे मराठीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. वरळी येथे आयोजित मराठी विश्व संमेलनात शुभेच्छा देतांना ते बोलत होते.


            विश्व मराठी संमेलनाच्या भारदस्त आयोजनासाठी मराठी भाषा विभागाचे अभिनंदन करून मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रभावी पाऊले उचलत आहे. शासकीय कामकाज मराठीतूनच व्हावे असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे संशोधनासारखा विषय मातृभाषेतून शिकविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विधी विषयक कामकाज मराठीतून व्हावे यासाठी कायदेविषयक शिक्षण मराठी भाषेतून देण्यात येणार आहे.


            मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. आयआयटी मुंबईने यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करून दिले आहे. या माध्यमातून इंग्रजी मधील पुस्तकं पूर्णतः मराठीतून वाचता येणार आहे. तसेच कोणत्याही भाषेतून मराठी विषय शिकविला गेला तरी त्याचा अभ्यास मराठीतून करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


            मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यायी सोपे शब्द शोधून त्यांना दैनंदिन वापरात प्रस्थापित करण्याची आवश्यकता श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.मराठी भाषा वाघिणीचे दूध आहे व महाराष्ट्राची अस्मिता आहे. राज्यातील सर्व व्यवहार हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजे असे मत विज्ञान शिक्षक प्रकाश पंचाल सरांनी व्यक्त केले. मराठी विश्व संमेलनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील मराठी शिक्षकांनाही आमंत्रित केले ही गोष्टच आमच्या सारख्या मराठी शिक्षकांना अभिमानास्पद वाटते असे प्रतिपादन मराठी भाषेच्या वरीष्ठ शिक्षिका संजिवनी नारकर यांनी केले. मराठी विश्व संमेलनाचे राज्य सरकारने उत्कृष्ट रितीने आयोजन केल्यामुळे जागतिक पातळीवर मराठी भाषेचा गौरव आहे अशी माहिती ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News