प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड व उपकेंद्र मांडवा येथे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, January 22, 2023

प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड व उपकेंद्र मांडवा येथे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 




किनवट : स्व. चुनिभाई मोतीभाई पटेल चॅरीटेबल ट्रस्ट यवतमाळ, साने गुरुजी रुग्णालय व संशोधन केंद्र किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य नाक, कान, घसा तपासणी व भौतिकोपचार शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड व उपकेंद्र मांडवा  येथे संपन्न झाला.

         सुप्रसिध्द नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. गौरव अनिल पटेल यवतमाळ व साने गुरुजी रुग्णालय किनवटचे भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. मधुसुदन यादव यांनी रुग्णांची विनामुल्य तपासणी व उपचार केले.

          सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत प्रा.आ. केंद्र राजगड व दुपारी २:३० ते ४:३० वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी अंतर्गत उपकेंद्र मांडवा येथे रूग्णांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबीराचा एकुण ७४ रुग्णांनी लाभ घेतला.

         या विनामूल्य तपासणी शिबीरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय नांदेड व तालुका आरोग्य अधिकारी किनवट यांचे मार्गदर्शन , तसेच प्रा.आ.केंद्र राजगडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि. आर. आईटवार , प्रा.आ.केंद्र  बोधडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर शिंदे व मांडवा उपकेंदाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांचे सहकार्य लाभले आहे.  

         शिबीराच्या यशस्वीतेसाठी साने गुरूजी रूग्णालयाचे व्यवस्थापक संजय बोलेनवार, समुपदेशक अजय वल्लेवार, कु. प्रियंका कुमरे, कु. सोयल राठोड यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News