भोकर : तालुक्यातील प्राथमिक शासकीय शाळा व खाजगी शाळेत अभ्यासक्रमा व्यतिरिक्त मंत्रो उपचारासह एका कथीत भोंदू बाबाच्या संस्काराचे विद्यार्थ्यांना धडे दिल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबीत करावे, अशी मागणी बसपाचे नांदेड जिल्हा सचिव डॉ. कैलास कानिंदे रेणापुरकर यांनी केली आहे.
तालुक्यातील डौर, सोनारी, सायाळ, नागापूर, रेणापूर, नांदा, हास्सापूर, रायखोड शिवमं शंकर विदयालय व इतर शाळेमध्ये भोंदू बाबाचे अंधभक्त हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शासकीय व खाजगी शाळेत जावून सदरील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या संगनमताने बलात्कारी भोंदू बाबाची शिकवण देवून सदरील विद्यार्थ्यांना अंधश्रध्देच्या खाईत टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
संबधीत मुख्याध्यापक व शिक्षकांनी आरटीई कायद्यानुसार काम न करता त्यास केराची टोपली दाखवित तालुक्यातील शाळेत धार्मिक कर्मकांड करून विद्यार्थ्यांना अंधश्रध्देत ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. ही असंविधानिक बाब असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबीत करून तात्काळ बडतर्फ करावे अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट राज्यात व भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी अशा अशयाचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्य सचिव,मंत्रालय मंबई, अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई, आयुक्त, औरंगाबाद, मुख्य कार्यकारी जि. प. नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, गटविकास अधिकारी पं. स. , भोकर, गट शिक्षणाधिकारी, पं.स., भोकर यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. निवेदनावर बसपा तालुका महासचिव कैलास कदम व इतर बसपा पदाधीकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




No comments:
Post a Comment