जागतिक हवामान दिना दिवशी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले परिसरातील झालेले बदल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 23, 2023

जागतिक हवामान दिना दिवशी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले परिसरातील झालेले बदल

        





मारतळा : गुरुवारी (ता. 23) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या मुलांनी  जागतिक हवामान दिनानिमित्त  जवळच असलेल्या  तळ्याला क्षेत्रभेट  देऊन येथील  होत असलेले बदल  जाणून घेतले.

         विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी जाणीव व्हावी. निसर्गात होणारे बदल समजून घ्यावेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन कशा पद्धतीने करावे.  यासाठी  हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे  मार्गदर्शन करताना उपक्रमशील शिक्षक रवी ढगे म्हणाले. पृथ्वी

माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत.जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.

वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. असे सविस्तर मार्गदर्शन केले.

          तसेच जागतिक हवामान संस्थेने यावर्षी दिलेली थीम चैतन्या ढेपे हिने सांगितले. पिढ्यान पिढ्या  हवामान  आणि पाण्याचे भविष्य अशी असल्याचे तिने सांगितले. यावेळी निसर्ग आपला मित्र असून  निसर्ग आपल्याला भरपूर देतो.  आता आपल्याला काही त्याला देण्याची वेळ आली आहे. असा संकल्प  साईप्रसाद वाघमारे , सोहम सोरटे, नंदिनी ढगे, दैवत गुंडेकर, रुद्र बत्तलवाड, माहीम पठाण, स्वरांजली खानसोळे  आदी विद्यार्थ्यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News