भोकर(नांदेड) : विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकरच्या कै.डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज शुक्रवारी (ता. ३१ मार्च २०२३) पाचव्या दिवसी ५७ उमेदवारी अर्जाची विक्री झाली; यामध्ये ग्राम पंचायत मधुन रेणापूर येथील डॉ. कैलास कानिदें रेणापुरकर यांच्यासह २६ जनांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण २९ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.
सहकारी संस्था मतदारसंघातून एकूण १९, ग्राम पंचायत मधुन ०८, अडते व व्यापारी मधून ०१, हमाल व मापाडी मधून ०१ असे एकूण २९ अर्ज आज अखेर दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत आहे.
विविध कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीसाठी अखेर सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कै. डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अर्ज भरून घेण्यात येत आहेत. पाच गटातील १८ जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यामुळे गटनिहाय अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवाराने आपण कोणत्या गटासाठी अर्ज दाखल करणार हे अर्जावर लिहावयाचे आहे. त्यानुसार त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतात. तरच तो अर्ज ग्राह्य मानला जात आहे. अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी नव्हती दिवसभरात २६ अर्ज दाखल झाले आहेत , अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सुनील गणलेवार यांनी सांगीतली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी साठी संजय जळके, नितीन जाधव, एन.पी. कडपेवाड आदि कर्मचारी सहकार्य करित आहेत.




No comments:
Post a Comment