कंधार (नांदेड) : मथुराबाई बापुराव गोधने, फुलवळकर (वय ८३ वर्षे ) यांचे बुधवारी (ता.१९) दुपारी ३ वाजता तालुक्यातील फुलवळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२o) सकाळी ११ वाजता फुलवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पती बापुराव गोधने, चार मुली चित्रा मनोहर गवई, सुमन मधुकरराव सोनकांबळे, शांता दिपकराव गायकवाड, रमा बळीराम बुकटे, तीन मुले राजेश बापुराव गोधने, निलेश बापुराव गोधने,भीमराव बापुराव गोधने, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार असुन त्या शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारूळचे माजी प्राचार्य शेषराव गोधने यांच्या मोठ्या वहिणी, सामाजिक कार्यकर्ते व इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँकेच्या सल्लागार समितीचे सचिव निलेश गोधने, फुलवळकर यांच्या मातोश्री तर माजी प्राचार्य मधुकरराव सोनकांबळे यांच्या सासु होत.
स्मृतिशेष मथुराबाई बापुराव गोधने, फुलवळकर यांच्या निधनाबद्दल भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे, औंढा नागनाथचे तहसिलदार कृष्णा कानगुले, चरक हॉस्पीटलचे संचालक तथा सिनेकलावंत डॉ.प्रमोद अंबाळकर, उद्योजक प्रविण साधू, नांदेड जिल्हा शिक्षण पतपेढी जिल्हा परिषद नांदेडचे माजी सचिव तथा संचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँकेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष बालासाहेब लोणे, लहानकर, प्रवर्तक गणपतराव गायकवाड, पंचायत विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीवनराव गोणारकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेशराव दुधमल, संभाजीराव वाठोरे, अराजपत्रित मुख्याध्यापक बबनराव घोडगे, बालाजीराव थोटवे, नागनाथ येरमलवाड, माधव कांबळे, रमेशराव गोवंदे, माधव कसबे, रामदास गोणारकर आदींनी आदरांजली वाहिली.




No comments:
Post a Comment