अभ्यासक्रम समजून नेमकेपणाने अभ्यास करणे हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गुपित असते -मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 25, 2023

अभ्यासक्रम समजून नेमकेपणाने अभ्यास करणे हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गुपित असते -मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे




नांदेड, 25 : कुठलेही काम श्रमाशिवाय साध्य होत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिश्रमाची जोड देणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम समजून नेमकेपणाने अभ्यास करणे हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गुपित असते. हे साध्य करण्यासाठी बेबी स्टेप्स घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

          मंगळवारी (ता.25) जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2023 -24 या वर्षासाठी मागासवर्गीय तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 50 जणांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वितरण आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.


     यावेळी मंचावर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अविनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल परिहार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर आदींची यावेळी उपस्थिती होती. 

       अमोल परिहार यांनी यावेळी स्पर्धा परीक्षेचा करावयाच्या अभ्यास, नियोजन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी स्वतः केलेल्या परिश्रमाचे दाखले दिले. आयपीएस अधिकारी  अविनाश कुमार यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेमकेपणा असावा.  पुस्तके आपण निवडणार आहोत, त्याचा सखोल अभ्यास करावा आणि इतर कोणत्याही वेगवेगळ्या परीक्षा द्याव्यात म्हणजे त्याचा अनुभव गाठीशी येतो यातून आपण समृद्ध होतो, असे त्यांनी सांगितले. पुणे, मुंबई किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास होतो असे नाही आता तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ऑनलाईन क्लासेस ही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचाही उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होऊ शकतो असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News