शरद पवार निवृत्ती घोषणा महाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 2, 2023

शरद पवार निवृत्ती घोषणा महाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त)

 


देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार शरद पवार. यांनी निवृत्तीची घोषणा करून देशांमध्ये, शेवटी राजकीय खळबळ उडवून दिली याविषयी राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त येथे देत आहोत. -सपादक

        एक मे 1960 ते 1 मे 1923 या प्रदीर्घकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेलं केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार शरद पवार. यांनी निवृत्तीची घोषणा करून देशांमध्ये, शेवटी राजकीय खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे नेतेही  स्तंभित झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. सहसा राजकारणापासून  दूर असलेल्या प्रतिभाताई आज या महत्त्वाच्या निर्णयासमयी  पवार साहेबांच्या समवेत होत्या आणि त्याही फार भावुक झालेले होत्या. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, अजित पवार, छगन भुजबळ धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील  अनेक नेते माननीय शरद पवार यांच्या समवेत  आज उपस्थित आहेत. 




अजित दादा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 


शरद पवार यांचे मत राष्ट्रवादी  काँग्रेसने नवीन अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादी वेगवेगळ्या निर्णय घेताना प्रमुखांना एकत्रच बसवायचे आणि त्याच्यामध्ये साधारण चर्चा करायचे काय कुणाचे मत आहे? काय नाही?याची चर्चा करायचे पण पुस्तकाच्या प्रकाशनात कार्यक्रमात निर्णय जाहीर केला.अजित दादा म्हणाले मला काही कळत नाही तुमचा उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर काय  होणार आहे?   राजकारणात ते त्या ठिकाणी सांगतील आणि उद्याच्याला साहेबांचं ज्यावेळेस साहेब आपल्याला बोलवतील तर आपण सगळे साहेबांनी हात दिल्यानंतर येणारच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे. साहेब देशामध्ये फिरणारच नाही या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पवार साहेबांचे मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना होणारे आहे. उद्याच्याला त्यांचा दांडगा सगळा अनुभव लक्षामध्ये घेता खासदारकीची निवडणूक आली, आमदारकीची निवडणूक आली, नवीन होणारा अध्यक्ष नवीन होणारी, कार्यकारणी बाकीचे सगळे सहकारी साहेबांची चर्चा करूनच पुढचे निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात  भावनिक होण्याचं काही कारण नाही हा प्रसंग कधी ना कधी येणार होता पण एक मेला हा निर्णय घेण्यात आला होता पण जाहीर केला नाही.    ज्या पद्धतीने साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला माजी आपल्याला विनंती आहे, साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू.  

शरद पवार यांनी घेतलेला निर्णय अनेक नेत्यांनाही धक्कादायक ठरला कारण याची पूर्वकल्पना कोणत्या नेत्यांना नव्हती अशी माहिती समोर आली आहे. पवार साहेबांनी घेतला निर्णय सर्वच नेत्यांना मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन अध्यक्ष हे त्यांची कमिटी निर्णय घेईल असे पवार साहेब जरी सांगत असले तरी शरद पवार ही एकमेव कमिटी आहे असे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेले राष्ट्रवादी काँग्रेस यांनी राज्यात आता चांगलीच आघाडी घेतली आहे आणि अशावेळी शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा धक्कादायक आहे असा अनेक राजकीय निरीक्षकांच मत आहे अल्पावधीतच महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि अशावेळी राष्ट्रवादी समोर एक मोठे आव्हान उभे राहिले. 



शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन आज झालं. याच भाषणात त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष चा पदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली खासदार म्हणून तीन वर्षे अद्याप शरद पवार यांची बाकी आहेत महिलांच्या वतीने माजी मंत्री फौजिया खान यांनी आज देशाला शरद पवार यांच्या कार्याची गरज आहे असे प्रतिपादन केल काही कार्यकर्त्यांनी प्रतिभाताई पाटील यांनाच गळ घातली की साहेबांना तुम्ही सांगा आणि निवृत्ती पासून परावृत्त करा अशी विनंती करण्यात आली. हजारो कार्यकर्ते आज उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News