किनवट : आदिवासी दुर्गम भागात काम तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांना गट समुहकाच्या आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करून योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले की, येथील गट समूहक हे आम्हाला वेळोवेळी मासीक मानधन घेण्यासाठी वेतनातील फरक निकाली काढण्यासाठी पैशाची मागणी करतात व शनिवारी, रविवारी व सुटीच्या दिवशी कोणतेही कारण सांगून हेतुपुरस्कर बोलावतात, अश्लील शब्दात बोलून अपमानीत करतात. दिलेले व्हावचर चुकिचे आहे, ह्यावर ह्यांची सही नाही, त्यांची सही नाही, असे म्हणून मानधनातील पैशाची मागणी करतात, पैसे न दिल्यास कामावरुन कमी करण्याची धमकी देतात व जानुन बुजून मानसिक त्रास देतात.
तरि सदरील त्रासातून व जाचातून मुक्त करण्यासाठी मानसिक त्रास देणारे किनवट तालुका गट समुहक जनार्धन काकडे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करुन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. असे निवेदन जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी दिले आहे.
या निवेदनावर ज्योती पंधरे, लता पवार, गोदावरी राठोड, शीला पाटील, लक्ष्मी आईटवार, अनिता राठोड, सुनिता सिडाम, शोभा चांदोडे आदींसह एकतीस गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





No comments:
Post a Comment