ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 13, 2023

ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत नोंदणी मुदत होती. 


वेळेत नोंदणी न करू शकलेल्या शिक्षकांना 20 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 


31 मार्च 2024 पर्यंत सेवेची 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 

पात्र शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 


प्रशिक्षण नोंदणी लिंक

https://training.scertmaha.ac.in


प्रशिक्षण तपशील खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे

www.maa.ac.in

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News