लातूर हिवताप व हत्तीरोग विभागाची आश्वासित प्रगती योजना विभागीय बैठक संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 10, 2023

लातूर हिवताप व हत्तीरोग विभागाची आश्वासित प्रगती योजना विभागीय बैठक संपन्न

 


नांदेड : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक २९ सप्टेंबर २०२१ च्या नविन सेवा प्रवेश विनियम व अधिसूचनामुळे प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने (१०,२०,३० वर्ष) तीन लाभांची सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगति योजना लाभ देय  बाबत लातूर परिमंडळ (नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद) जिल्ह्यातील पात्र क्षेत्र कर्मचारी, बहुदेशीय आरोग्य कर्मचारी,आरोग्य सहाय्यक यांचे जिल्हा हिवताप अधिकारी यांचे कडून आश्वासित प्रगति योजनेचा प्रस्ताव प्राप्त करुन निवड समितिची विभागीय बैठक आज दिनांक १० जुलै रोजी उपसंचालक कार्यालय लातूर येथे अध्यक्ष तथा उपसंचालक आरोग्य सेवा लातूर डॉ प्रदिप ढेले, सदस्य सचिव तथा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर डॉ संजय ढगे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा लातूर श्री डी.व्ही. करवर, सदस्य जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड डॉ आकाश देशमुख, लातूर डॉ हिंडोळे, उस्मनाबाद डॉ मेंढेकर, बीड व्ही.बी.शिंदे, सदस्य मागासवर्गीय डॉ जगदीश सूर्यवंशी यांच्या उपस्थतीमध्ये बैठक संपन्न झाली. 

       विविध संघटना व कर्मचारी यांची बऱ्याच दिवसापासून आश्र्वासित प्रगती योजना (१०,२०,३० वर्ष) लाभ मंजूर करण्याची मागणी होती. काही कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. तसेच आज जवळपास सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत त्यांचे आदेश लवकरच देण्यात येणार आहेत. ज्या कर्मचारी यांच्या प्रस्ताव मध्ये त्रुटी आहेत त्यांच्या त्रुटींची पूर्तता करून व नविन प्रस्त्ताव ( ज्या कर्मचारी यांना दिनांक २९ सप्टेंबर २०२१ पूर्वी  १०,२०,३० वर्ष सेवा पूर्ण झाले आहेत) त्यांचे प्रस्ताव संबधित जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या कड्रून  मागवून येत्या पंधरा दिवसात विभागीय बैठक घेवून सर्व प्रस्ताव निकाली काढण्यात येणार आहेत अशी माहिती सदस्य सचिव तथा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर डॉ संजय ढगे यांनी दिली.

     यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक राहुल जाधव, श्रीमती शेटकार, नांदेड कार्यालयीन अधिक्षक कैलाश सावळे, लिपिक श्रीमती चव्हाण, मैनु यांनी विभागीय बैठक मध्ये काम पाहिले.

आश्र्वासित प्रगती योजना यशस्वी रित्या राबविल्या  बदल डॉ संजय ढगे साहेब यांचे हिवताप संघटनेचे  राज्य कोषाआध्क्ष, नांदेड जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गित्ते, व्यंकटेश पुलकंठवार, माधव कोल्हे, चंद्रभान धोंडगे, नागोराव रणखांब, लातुर विभागीय अध्यक्ष अजित पाटील, लक्ष्मीकांत  सोनवणे, ठोंबरे, आकोलकर, सुरेश पवार, मुरली जाधव, विजय सराफ, सचिन कुलकर्णी, शंकर मोरे, अखिल कुलकर्णी,अचुत सोळंके,  उस्मनाबाद संतोष माळी, तानाजी माळी, बीड सुनिल गायकवाड, राजेश धुतडमल व बंडू राख यांनी   अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News