माहुर-किनवट तालुका पेंटर संघटनेची बैठक संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 22, 2023

माहुर-किनवट तालुका पेंटर संघटनेची बैठक संपन्न

 



किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी येथील फुलाजी बाबा संस्थान येथे  महाराष्ट्र पेंटर संघटनेच्या माहुर-किनवट तालुका शाखेची बैठक घेण्यात आली. यावळी विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.

         यावेळी पेंटर संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव हनवते अध्यक्षस्थानी होते. तर ग्राम पंचायत घोटीचे उप सरपंच सुरोशे पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

        शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर 2003 ) पेंटर संघटना स्थापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत  पी. एम. विश्वकर्मा योजनेचा लाभ इतर कारागीरांना आहे परंतु हस्तकला पेंटर यांना यातून  वगळण्यात आले आहे. पेंटर बांधवांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावे या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच पेंटींग विषयी असणाऱ्या अनेक मुद्यावर चर्चा झाली.

     याप्रसंगी पेंटर मेश्राम, पेंटर धुर्वे, पेंटर जावेद, पेंटर कातले, पेंटर सुरेशवार, पेंटर आराध्ये,  पेंटर भगत, पेंटर हानिफ, पेंटर घुले, पेंटर राठोड, पेंटर प्रतिरूप, पेंटर वाघाडे उपस्थित होते. पेंटर अनिल उमरे यांनी सूत्रसंचालन केले. पेंटर दिसलवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News