किनवट : येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने लातूर येथे संपन्न झालेल्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सव -२०२३ मध्ये 'आदिवासी लोकनृत्य ' या कलाप्रकारातील व्दित्तीय पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे ता. १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान आंतरमहाविद्यालयीन "ज्ञानतीर्थ युवक महोत्सव -२०२३"चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बळीराम पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने आदिवासी लोकनृत्य या कलाप्रकारात अत्यंत उत्तम नृत्य सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत व्दित्तीय पुरस्कार मिळविला आहे. या सोबतच ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात, चित्रकला, रांगोळी, मेंहदी, सुगम गायन भारतीय, समुहगायन भारतीय, आंबेडकरी जलसा, कव्वाली इत्यादी कलाप्रकार सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
आदिवासी लोकनृत्य या कलाप्रकारात योगेश नैताम, रोहन धुर्वे, पवन कोडापे, ओमकार कानडे, ओमकार मुंडे , गोपाल पेंदोर, विवेक धुर्वे, विशाल पेंदोर, रुपेश तोडसाम, राहूल उदे,
रोहित नैताम, धर्मेश पोयाम, सागर आत्राम या नृत्यकलावंतांनी वादकांच्या साथीने उत्कृष्ट सादरीकरण केले.
इतर कलाप्रकारात सहभागी कलावंत : रांगोळी -दिव्या अचककुलवार, मेहंदी -श्रेया खोब्रागडे, चित्रकला -वैष्णवी एड्रावार,
सुगम गायन (भारतीय), समूह गायन, कव्वाली, आंबेडकरी जलसा, इ.कलाप्रकार -श्वेता वाघमारे, शिवाणी पंतगे, निकिंता सोळुंखे
संघप्रमुख म्हणून उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे व संघव्यस्थापिका म्हणून प्रा. डॉ. शुंभागी दिवे यांनी काम पाहिले. या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात पुरस्कार मिल्या बद्दल किनवट शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, कार्यालयीन अधिक्षक यमुना कुमरे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment