‘संविधान दिना’निमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांची मुलाखत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 23, 2023

‘संविधान दिना’निमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांची मुलाखत




मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास’ या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक ई. झेड. खोब्रागडे यांची भारतीय संविधान, त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

भारतीय संविधानाचे वेगळेपण, देशभरात साजरा केला जात असलेला संविधान दिन, संविधानातील मूलभूत अधिकारांचे वर्णन, लोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभांची संविधानिक जबाबदारी, संविधानातील मूलभूत कर्तव्यांचा समावेश आदी विषयांची सविस्तर माहिती, श्री.खोब्रागडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर शुक्रवार दि. २४, शनिवार दि. २५ आणि सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News