संविधान गौरव वत्कृत्व स्पर्धा संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 3, 2023

संविधान गौरव वत्कृत्व स्पर्धा संपन्न

 



मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कालखंड पार करणाऱ्या स्वतंत्र भारताची शताब्दीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र असा आपल्या देशाचा नावलौकिक आहे. हा लौकिक पुढील वाटचालीत भारताने कायम स्वरूपी टिकवावा. युवा पीढीत संविधान संस्कृती रूजवण्यासाठी व युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी गेली सात वर्षे आंतर महाविद्यालयीन संविधान गौरव वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन चेतना महाविद्यालयात वांद्रे मुंबईच्यावतीने करण्यात येते.

      मुंबई व उपनगरातील कनिष्ठ महाविद्यालये व मुंबई विद्यापीठाशी संलग्न वरीष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चेतना महाविद्यालयात वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 


भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका लोकशाहीला पोषक आहे का? जाती निहाय जनगणना व सामाजिक न्याय,तसेच कल्याणकारी राज्य संकल्पना व शिक्षणाचे खाजगीकरण हे तीन विषय वत्कृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

     यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद देवडेकर, सचिव प्राध्यापक किरण राजभोज, चेतना कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक श्री गिरीश साळवे आदी मान्यवरासह महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वर्ग या कार्यक्रमाला  उपस्थीत होते. 

     या स्पर्धेत प्रथम क्रमांक यश पाटील, द्वितीय क्रमांक पंकज पांडूले, तृतीय क्रमांक मानसी शिंदे उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे प्रणीत चौगुले व श्रावणी पालकर यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News