मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने घरोघरी सर्वेक्षणास येणाऱ्या प्रगणकांना कुटूंब प्रमुखांनी घरी थांबून माहिती द्यावी -तहसीलदार डॉ. मृणाल जाधव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, January 21, 2024

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने घरोघरी सर्वेक्षणास येणाऱ्या प्रगणकांना कुटूंब प्रमुखांनी घरी थांबून माहिती द्यावी -तहसीलदार डॉ. मृणाल जाधव

 



किनवट : राज्य मागास आयोगाच्या वतीने ता. 23 ते 31 जानेवारी दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना कुटूंब प्रमुखांनी घरी थांबून आपली माहिती द्यावी, तसेच गाव पातळीवरील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रगणकांना सर्वेक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले.
        रविवारी (ता.21) येथील तहसील कार्यालयात आयोजित प्रगणकांच्या सर्वेक्षण प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. मंचावर उपस्थित असलेले नायब तहसीलदार अनिता कोलगणे व गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना तहसीलदार डॉ. जाधव असे म्हणाल्या की, युद्धपातळीवर होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी तालुक्यातील सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख हे नियंत्रण अधिकारी असून ते प्रत्येक गावात होणाऱ्या सर्वेक्षणाची नियमीत पाहणी करतील. गाव पातळीवरील सर्व अधिकारी-कर्मचारी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, कोतवाल यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. सर्वेक्षणा दरम्यान कुटुंब प्रमुखांनी घरी थांबुन आपली माहिती प्रगणकांना द्यावी.
     राज्य शासनाच्या मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ता. 23 जानेवारी 2024 ते ता. 31 जानेवारी 2024 या कालावधीत किनवट तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षण करुन माहिती गोळा करण्यात येणार असून सदर कामाच्या अनुषंगाने पर्यवेक्षक व प्रगणकांसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.
        तालुक्यासाठी 16 पर्यवेक्षक  व 235 प्रगणक नियुक्त करण्यात आले असून पहिल्या सत्रात दुपारी 12 ते 2 या वेळेत 119  व दुसऱ्या सत्रात दुपारी 2.30 ते 4 .30 या वेळेत 116 प्रगणकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्वेक्षण ऍप बाबत संदीप पाटील यांनी माहिती दिली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी नितीन शिंदे, इनामदार व देवकते आदिंनी परिश्रम घेतले.
       

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News