एक राज्य एक गणवेश ; शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 24, 2024

एक राज्य एक गणवेश ; शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे .


राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रीडा  विभागाकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधिन शासन निर्णयानुसार , सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनांच्या मोर्फत गणेवश योजना अंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देणेबाबत , निर्णय घेण्यात आला आहे

शुध्दिपत्रक.....


एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत....


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुध्दिपत्रक काढले आहे. 

 सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 


राज्यातील इ.१ ली ते इ. ४ थी पर्यंतच्या मुलींकरीता पिनो फ्रॉक (Pino Frock), इ.५ वी ते इ.७ वी पर्यंतच्या मुलींकरीता शर्ट व स्कर्ट आणि इ.८ वी मधील मुलींकरीता सलवार-कमीज व ओढणी तसेच, इ.१ ली ते इ.७ वी पर्यंतच्या मुलांकरीता हाफ पँट व हाफ शर्ट व इ.८ वी मधील मुलांकरीता फुल पँट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेशाची रचना करण्यात घ्यावी.अशा प्रकारचे परीपत्रक जाहीर झाले असल्याने पुढील शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना समान गणवेश मिळेल अशी प्रतिक्रिया कला शिक्षक अभय ठाकरे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News