मराठा आंदोलकांना आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली ; तरीही 26 जानेवारी रोजी मराठा वादळ मुंबईत थडकण्यावर ठाम ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, January 25, 2024

मराठा आंदोलकांना आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली ; तरीही 26 जानेवारी रोजी मराठा वादळ मुंबईत थडकण्यावर ठाम !

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा समर्थकांसह मुंबईत आगेकूच करत आहे. लाखो समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईजवळ मराठा आंदोलनकर्ते धडकले आहेत. 

नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास परवानगी मुंबई पोलीसांनी नाकारली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार  होते. या आंदोलनासाठी सध्या मनोज जरांगे लाखो बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. परंतु त्यापूर्वीच त्यांना फार मोठा धक्का बसला आहे. 

 मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये जरांगे पाटील यांना आझाद मैदान  किंवा शिवाजी पार्क मैदानावर व आंदोलन करता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. याऐवजी ते खारघर इथल्या मैदानात आंदोलन करू शकतात असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. या नोटीशीला आता मराठा समाजाच्या बाजूने एडव्होकेट सतिश माने शिंदे कायदेशीर उत्तर देणार आहेत.


 मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतील, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.मुंबईत सहा फेब्रुवारी पर्यंत जमावबंदी जाहीर केली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News