एमएसबीसीसीसी ऍपमध्ये आता "बुद्धिस्ट/ नवबौद्ध-अनुसुचित जाती" चा समावेश ; राज्यमागासवर्ग आयोगाने दिले नवीन ऍप इन्स्टॉल करून सर्वेक्षण करण्याचे आदेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, January 26, 2024

एमएसबीसीसीसी ऍपमध्ये आता "बुद्धिस्ट/ नवबौद्ध-अनुसुचित जाती" चा समावेश ; राज्यमागासवर्ग आयोगाने दिले नवीन ऍप इन्स्टॉल करून सर्वेक्षण करण्याचे आदेश

 



पुणे : राज्य मागास आयोगाच्या वतीने ता. 23 ते 31 जानेवारी दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी  राज्यातील प्रत्येक गावात घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठीच्या (एमएसबीसीसीसी) ऍपमध्ये आता "बुद्धिस्ट/ नवबौद्ध-अनुसुचित जाती" चा समावेश करण्यात आला असून प्रगणकांना नवीन ऍप इन्स्टॉल करून घेऊन काम करावे, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव आ.उ.पाटील यांनी कळविले आहे.
       राज्य मागास आयोगाच्या वतीने ता. 23 ते 31 जानेवारी दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठीच्या ऍपमध्ये पूर्वी जातीच्या टॅबमध्ये फक्त 'महार' अशी नोंद केली होती. त्यामुळे 1956 च्या धम्मदीक्षेनंतर धर्मांतरीत सर्वच बौद्ध बांधवांनी ' बौद्ध , नवबौद्ध ' अशीच नोंद करावी. असा आग्रह प्रगणकांकडे धरला होता. राज्यभरातून आलेल्या सूचनांवरून पुणे येथील महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने आपला पूर्वीचे आयोगाकडील पत्र क्र.३५१/२०२३/प्रशिक्षण/१९९ मागे घेऊन सुधारित पत्र जा.क्र.प्र.क्र.३५१/२०२३/प्रशिक्षण/ २०४ दि.२५ जानेवारी २०२४ अन्वये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व  महानगरपालिका आयुक्त यांना पुढील प्रमाणी नवीन सूचना दिल्या आहेत.
     Software Application मध्ये आरक्षित जातींच्या यादीत "बुद्धिस्ट/ नवबौद्ध-अनुसुचित जाती" अशी नोंद घ्यावी. अशी नोंद घेण्याकरिता Software application मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सर्वेक्षणासाठी चालू Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापूर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात. असे कळविले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News