मराठा आंदोलनकर्ते मुंबईच्या वेशीवर सरकारची लक्तरे टांगणार! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा मुंबईहून ग्राऊंड रिपोर्ट) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Friday, January 26, 2024

मराठा आंदोलनकर्ते मुंबईच्या वेशीवर सरकारची लक्तरे टांगणार! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा मुंबईहून ग्राऊंड रिपोर्ट)

 
मराठा आंदोलनकर्ते मुंबईच्या वेशीवर 

सरकारची लक्तरे  टांगणार! 

(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा मुंबईहून ग्राऊंड रिपोर्ट) 


      मनोज जरांगे यांचा आंदोलकांचा मोठा जथ्था नवी मुंबई वाशी येथेच आज मुक्काम करणार आहे. मराठा आरक्षण संदर्भात आज रात्रीपर्यंत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास उद्या सकाळी आपल्या समर्थकासह मनोज जरांगे मुंबईकडे कुच करतील आणि आझाद मैदानावर आपली भूमिका स्पष्ट करतील. आपल्या समर्थकांना उद्देशून मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची घोषणा केलेली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये आणि जर केल्यास मराठा आरक्षणाची जागा रिकाम्या ठेवा अशी मागणी सुद्धा त्यांनी सरकारकडे प्रसार माध्यमाद्वारे केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे दोन प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु त्यांची चर्चा निष्पळ ठरली. 

     मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आज सकाळपासून त्यांनी उपोषण सुरू केले. आजचा मुंबईकडे जाणारा त्यांचा कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे लाखो मराठा कार्यकर्ते वाशी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या भोजनाची सोय तेथील समाजसेवक आणि कार्यकर्ते यांच्या कडून केली जात आहे. मराठा समाजातील सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. मोफत शिक्षणाच्या अटीत बदल करण्याची मनोज जरांगे पाटलांची ही मागणी मान्य होईल का?   मराठा समाजातील लाखो मुला- मुलींना फी मुळे शिक्षण घेता येत नाही. बारावीनंतर शिक्षण घेणं परवडत नाही. मराठा समाजातील लाखो तरुण यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित आहेत. हाच महत्त्वाचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांनी उचलून धरला.  आरक्षणाचा नवीन  अध्यादेश काढण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. 

नवी मुंबई : शिवाजीनगर , वाशी येथे जमलेले आंदोलक


      मनोज जरांगे यांना मुंबई बाहेर रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अध्यादेश न काढल्यास उद्या म्हणजे 27 तारखेला मनोज जरांगे  आपल्या समर्थकांसह आझाद मैदानावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. आंदोलक  मुंबईत येऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनंती केली . कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 

      सुप्रीम कोर्टाने एकदा आरक्षण नाकारले आहे. कायद्यासमोर सरकार कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकले पाहिजे. या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन, तसे भक्कम पुरावे गोळा करण्याच्या कामाला सरकार लागले आहे. असे राजकीय सूत्राकडून सांगितले जाते. आज वाशीमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना संबोधित केले आणि शांततेचा सल्ला दिला.  कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यामुळे आपल्या समर्थकांनी नियमाचे आणि शिस्तीचे पालन करावे , असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केले. 

     शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत त्यांनी आपल्या मराठा बांधवांना आवाहन करत आपली भूमिका स्पष्ट केली. वाशी म्हणजे नवी मुंबई. येथे लाखो समर्थकांना उद्देशून भाषण करतांना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो असे आवाहन बाळासाहेब ठाकरे करतात त्याच पद्धतीने आज मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना साथ घातली. अत्यंत आत्मविश्वास व भाषणाची नवीन पध्दत आज मराठा क्रांतिकारी नेते मनोज जरांगे यांच्यात जाणवली. अशी प्रतिक्रिया अभय ठाकरे यांनी व्यक्त केली. 

     सरकार उद्या सकाळपर्यंत कोणता निर्णय घेते या कडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मुंबईत आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी आझाद नगर पोलिसांनी यापुर्वीच नोटीस दिली आहे. परंतु आंदोलक विजयाचा गुलाल उधळत मुंबईत येतात की आंदोलन करण्यासाठी येतात हे लवकरच कळेल!


मराठा जमाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.


     या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News