प्रशांत डिंगणकर यांच्या "पाषाण "ला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचा सुवर्ण पुरस्कार जाहीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, March 8, 2024

प्रशांत डिंगणकर यांच्या "पाषाण "ला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचा सुवर्ण पुरस्कार जाहीर



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली असून पत्रकार, कवी प्रशांत डिंगणकर यांच्या पाषाण या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.  प्रशांत डिंगणकर यांची "दगड "या विषयावर साडेतीन हजार शब्दांची मराठीत दीर्घ कविता सन २०१७ ला प्रकाशित झाली, त्याला मराठी वाङमयाचे पुरस्कार प्राप्त झाला . त्याच कवितेचा हिंदी भावानुवाद प्रशांत डिंगणकर यांनी केला असून त्याचे "पाषाण" या नावाने दिव्य प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर (सुवर्ण) पुरस्कार घोषित झाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांसह जीवन गौरव आणि कथा, कादंबरी, कविता, अनुवाद अशा विविध १३ गटात साहित्य अकादमीने पुरस्कार घोषीत केले आहेत.

प्रशांत डिंगणकर यांच्या या यशाबद्दल साहित्य व राजकीय क्षैत्रातून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News