प्रबोधन चळवळीतील कलावंत दिगांबर नारायणराव कावळे यांचे निधन : मंगळवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 12, 2024

प्रबोधन चळवळीतील कलावंत दिगांबर नारायणराव कावळे यांचे निधन : मंगळवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार

 


किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील  प्रबोधन चळवळीतील कलावंत , लेखक दिगांबर नारायणराव कावळे (वय 91 वर्षे ) यांचे मंगळवारी (ता.12) सकाळी 8.30 वाजता वृद्धापकाळाने आपल्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पत्नीचे शनिवारी (ता.9) रोजी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी दिगांबर कावळे यांनीही प्राण त्यागला.

            नांदेड मार्गावर असलेल्या गोकुंदा येथील त्यांच्या निवासस्थानापासून मंगळवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून पैनगंगातिरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

          त्यांचे पश्चात दोन मुलगे , तीन मुली , सुना जावई , भाऊ , बहीण , नातवंडे असा मोठा परिवार असून बावळटकर गौतम कावळे यांचे ते थोरले बंधू , माजी उपसरपंच यशवंत कावळे व अकोला बँकेतील अधिकारी दीपक कावळे यांचे ते वडील होत.

            तालुक्यातील कोपरा हे त्यांचे मूळ गाव. तिथे  शेतमजूर , सालगडी असे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवीत होते. यात कितीही केलं तरी पळसाला पानं तिनच. अशी त्यांना जेव्हा समज आली. आपलं आयुष्य काबाडकष्ट करण्यात गेलं त गेलं परंतु मुलांना चांगला शिकवून घडवायचं असं मनोमनी ठरवून  त्यांनी किनवट गाठलं. शहरालगतच असलेल्या गोकुंदा येथे आपलं बिऱ्हाड थाटलं. आई , भाऊ, वहिणी , बहीण , मुलं असं मोठं कुटूंब. येथेही काही दिवस रोजमजुरी करून आंबे , जांभ , बोरं , केळी डोक्यावर घेऊन फिरून विकायला सुरुवात केली. भाऊ , बहीण , मुलाचं लग्न त्यांनी केलं. छोट्या मुली मुलांचं शिक्षण कटाक्षाने चालू ठेवलं. आज त्यांची व त्यांच्या भाऊ बहिणींची मुलं शिकून चांगल्या पदावर कार्य करीत आहेत.

           वयाच्या 58 व्या वर्षी ते साक्षरता अभियानात साक्षर झाले. त्यानंतर मिळेल ते वाचू लागले. त्यांनी जवळपास चारशे ते पाचशे पुस्तकं वाचून आपली वाचनाची भूक भागवली. त्यातून मिळालेल्या ज्ञानातून गावोगावी फिरून शाळा , महाविद्यालयातून व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर गीत गायन व प्रबोधन केले. शासनाच्यावतीने त्यांना मा. वृद्ध कलावंत मानधन सुरू झाले. त्यांनी चार पुस्तकाचे हस्तलिखित लिहिले. त्यांचे "जगाचे सत्यदैवत " हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर ( मुद्रणालयात छपाईसाठी दिलेले ) आहे. अत्यंत मित् भाषी , स्पष्टवक्तेपण , प्रेमळ स्वभाव व दिलेल्या शब्दाला पाळणारा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पावन स्मृतिंना विनम्र अभिवादन.

           

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News