सशक्त लोकशाहीसाठी मतदान करा -मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 31, 2024

सशक्त लोकशाहीसाठी मतदान करा -मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

 


नांदेड,ता.31 : मतदान प्रक्रियेप्रति आजचे युवक जागरूक व्हावेत तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मतदान शक्ती असून  तो  देशसेवेचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

      नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयात रविवारी (ता.  30 मार्च )  स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका तथा प्राचार्या डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, पत्रकारिता माध्यमशात्र विभागाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी तसेच सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

     पुढे त्या म्हणाल्या,  कोणत्याही नागरिकांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ज्यांनी 18 वर्षे पूर्ण केले परंतु अद्यापही मतदार यादीत नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावी. येत्या 4 एप्रिल पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. सन 2019 च्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 65 टक्के मतदान झाले होते. परंतु 35 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. राष्ट्रीय विकास व सशक्त लोकशाहीसाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व मतदारांनी मतदान करावे. 

     शिक्षणासाठी काही युवक शहरात आले असतील त्यांनी आपल्या गावी जाऊन 26 एप्रिल रोजी मतदान करावे. मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे. प्रत्येक युवक-युवतींनी  यादिवशी शंभर टक्के मतदान करुन बळकट लोकशाहीसाठी शक्ती दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  याप्रसंगी उपस्थित तीन हजार विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगितले. 


     नांदेड सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या स्पीप (जनजागृती) साठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ग्रामीण भागासाठी तर  नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे शहरी भागासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांच्याही मार्गदर्शनात नांदेड लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमांनी मतदानासाठी जनजागृती केली जात आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News