विना परवाना बॅनर व एल.ई.डी. स्क्रीन लावून प्रचार करणारे वाहन ताब्यात घेऊन किनवटमध्ये पहिला गुन्हा दाखल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 9, 2024

विना परवाना बॅनर व एल.ई.डी. स्क्रीन लावून प्रचार करणारे वाहन ताब्यात घेऊन किनवटमध्ये पहिला गुन्हा दाखल

 



किनवट : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदार संघातर्गत किनवट विधानसभा मतदार संघात फिरत्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून  मालक व चालकावर गुन्हा दाखल करून मांडवी पोलिसांनी विना परवाना बॅनर व एल.ई.डी. स्क्रीन लावून प्रचार करणारे वाहन ताब्यात घेतले आहे. आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचा हा  किनवटमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

              16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  ची  घोषणा झाल्यानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील 83- किनवट विधानसभा मतदार संघात भरारी पथक (एफ.एस.टी.) व स्थैतिक संनिरीक्षण चमू (एस.एस.टी. ) पथकं स्थापित करण्यात आली आहेत. नामनिर्देश पत्र दाखल करण्याची जाहीर झालेली तारीख 26 मार्च पासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानुषंगाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली(भाप्रसे ) यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी कुलदीप यादव यांच्या नेतृत्वात मांडवी पोलिस स्टेशन अंतर्गत स्थापित एफ.एस.टी. पथक क्रमांक 2 (अ) चे प्रमुख कोंडबा सिडाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (ता.9 ) गुन्हा दाखल करून मांडवी पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. 83- किनवट विधानसभा मतदार संघातील हा पहिला गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात दहशत पसरली आहे.

          श्री सिडाम यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की , मी दि. 16/03/2024 पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अनुषंगाने भरारी पथक (एफ.एस.टी.) मांडवी 02 (अ ) चा पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सोमवारी (ता. 08 एप्रिल 2024 )  कर्तव्यावर कार्यरत असताना दुपारी 16.30 वा. चे सुमारास माझ्या पथकातील संतोष धोकटे , पोस्टे माडवी चे पो.शि.975 कांबळे , चालक मनिष आसळकर, कॅमेरामन आकाश चव्हाण याचे सह  पिंपळगाव फाटा येथील एस.एस.टी. चेक पोस्ट येथे जाउन वाहन चेक करुन उनकेश्वर नाका येथील एस.एस.टी. चेक पोस्ट कडे जात असताना एस.एस.टी. चेक पोस्ट उनकेश्वर चे पथक प्रमुख एस. पी. जाधव यांनी कॉल करून कळविले की, आम्ही सदर चेक पोस्टवर एक वाहन अडविले असुन सदर वाहनावर बीजेपी पक्षाचे विकसित भारत, मोदीची गॅरंटी तसेच बीजेपी लाच मतदान करा असे लिहिलेले व पक्षाचे चिन्ह असुन सद चे वाहन आम्ही थांबवून ठेवलेले आहे. त्यावरुन आम्ही सदर घटनास्थळी भेट दिली असता आम्हाला एक वाहन ज्याचा क्रमाक एम. एच.08 एच. 8404 असे मिळून आले. सदर वाहनाचे चालकाला आम्ही त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव  रावसाहेब शिंदे रा. गुंडा ता. कंधार जि. नांदेड असे सांगीतले तसेच आम्ही त्यास निवडणुक प्रचाराचा परवाना आहे का ? असे विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले.त्यावरुन आम्ही तशी माहिती वरीष्ठांना देउन सदरचे वाहन पोलीस स्टेशन मांडवी येथे डिटेन केले आहे. आदर्श आचारसंहिता ही दि. 26/03/2024 पासून लागू झालेली असून सदर आचारसंहिते दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांची परवानगी घेणे आवश्यक असताना सदर वाहनाचे मालक रावसाहेब जगदेराव शिंदे व चालक बालाजी गोविंद शिंदे वय 23 वर्ष दोन्ही रा. गुंडा ता. कंधार जि. नांदेड यानी कोणतीही परवानगी न घेता सदरचे वाहन एम. एच.08 एच.8404 हे भा.ज.पा. या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे बॅनर लावून, तसेच एल.ई.डी. स्क्रीन लावून नांदेड ते चंद्रपुरकडे जात असतांना मिळून आल्याने त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने माझी त्यांचेविरुध्द भा.दं.वि. 1860 कलम 188 अन्वये कायदेशीर तक्रार आहे.

        ही फिर्याद दिल्यावरून मांडवी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.8 ) दुपारी 4.30 वाजता पथम खबरी अहवाल दाखल झाला असून मंगळवारी (ता.9) दुपारी 1.00 वाजता नोंद क्र.12 नुसार गुन्हा नोंद झाला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News