हिंगोली लोकसभा निवडणूकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज सर्वांनी मतदानाद्वारे आपला हक्क आणि कर्तव्य बजावून आपली लोकशाही समृध्द करावी -मेघना कावली, भाप्रसे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, April 25, 2024

हिंगोली लोकसभा निवडणूकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज सर्वांनी मतदानाद्वारे आपला हक्क आणि कर्तव्य बजावून आपली लोकशाही समृध्द करावी -मेघना कावली, भाप्रसे

किनवट : लोकसभा निवडणूकीकरिता मतदान पथकांना साहित्य वाटपास शुभारंभ करतांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली,भाप्रसे


किनवट : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातर्गत 83-किनवट विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी (ता.26) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 330 मतदान केंद्रावर 330 (राखीव 55) मतदान यंत्राद्वारे निर्भय, निःपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी 801 पोलिस अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या तैनातीसह तीन हजार अधिकारी कर्मचारी यांचेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी सांगितले.


                किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 38 हजार 536 पुरुष, 1 लाख 30 हजार 578 स्त्री व 12  ईतर असे एकूण 2 लाख 69 हजार 126 मतदार आहेत. 330 मतदान केंद्रापैकी महात्मा फुले विद्यालय गोकुंदा येथे एक महिलांसाठी व एक दिव्यांगासाठी आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे एक महिला  व एक युवक  मतदारांसाठी असे 4 स्वतंत्र  मतदान केंद्र  आहेत. दिव्यांगासाठीच्या सुलभ निवडणुका अंतर्गत तिथे सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. 7 मतदान केंद्र संवेदनशील व 7 शॅडो मतदान केंद्र असून येथे केंदीय राखीव दल तैनात केले आहेत. तसेच 14 सूक्ष्म निरीक्षक राहणार आहेत. या केंद्रासह 165  मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया (मतदान अधिकारी तीन पर्यंतची) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन थेट प्रक्षेपित होणार आहे.

किनवट : लोकसभा निवडणूकीकरिता टपाली मतदान सुलभीकरण कक्षाच्या कामाचे निरिक्षण करतांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली,भाप्रसे

                औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयातून गुरूवारी (ता.25) सहायक निवडणूक अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसिलदार (किनवट) डॉ. शारदा चौंडकर, तहसिलदार (माहूर ) किशोर यादव  यांनी जीपीएस यंत्रणा बसविलेल्या वाहनाद्वारे मतदान पथके रवाना केली. याकरिता एस.टी. महामंडळाच्या बस 38, स्कूल बस 10, जीप 53 अधिग्रहीत केली होती.


                जिल्ह्यातील ईतर विधानसभा मतदारसंघातून येथे आलेल्या 376 मतदान केंद्राध्यक्ष, 376 सहायक मतदान केंद्राध्यक्ष व 376 इतर मतदान अधिकारी एक व  376 इतर मतदान अधिकारी दोन अशा एकूण एक हजार पाचशे छप्पन्न आहे . यांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक चालक तथागत पाटील यांच्या साथीने एलईडी वॉल वर  पॉवर पॉईंट प्रझेंटेशन द्वारे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार (निवडणूक)  मुगाजी काकडे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. दुसऱ्या सत्रात स्वामी मल्लीकार्जून,  ग.नु. जाधव, रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर , सारंग घुले आदींसह सर्व 37 मास्टर ट्रेनर्स यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले. 


                  चोख पोलिस बंदोबस्त


उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाच्या वतीने मतदानासाठी  पोलिस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक असे एकूण 22 अधिकारी , 488 पोलिस कर्मचारी (स्त्री -पुरुष), 291  होमगार्ड, 1 सेक्शन एस.आर.पी.एफ. (112 जवानांचा चमू ) यांच्या चोख पोलिस बंदोबस्तासह 23 वाहने  उपलब्ध केली आहेत.     


               गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव (किनवट) व  सुरेश कांबळे (माहूर), कुलदीप यादव यांच्या समन्वयात सर्व फिरते व स्थानिक पथक, जगदीश पऱ्हाड यांच्या समन्वयात 80 सहायक व क्षेत्रिय अधिकारी, स्वीप कक्ष प्रमुख ज्ञानोबा बने तसेच नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, व्ही.पी. राठोड , अनिता कोलगणे , राजकुमार राठोड , केलास जेठे आदिंसह प्रकाश टारपे , के.डी. कांबळे, डी.सी. भुरे , नितीन शिंदे, व्ही.टी. सूर्यवंशी, एस.पी. जुंकटवार, गोविंद पांपटवार, संदीप पाटील , प्रभू पानोडे , संतोष मुपडे आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई व कोतवाल निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

किनवट : लोकसभा निवडणूकीच्या मतदाना करिता मतदान केंद्राध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांना मतदान यंत्र वाटप करतांना मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी, रूपेश मुनेश्वर, सारंग घुले

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News