हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट विधानसभेत सर्वाधिक 65. 86 % मतदान # 33 उमेदवारांचे भवितव्य 330 मतदान यंत्रात बंद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, April 28, 2024

हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट विधानसभेत सर्वाधिक 65. 86 % मतदान # 33 उमेदवारांचे भवितव्य 330 मतदान यंत्रात बंद

 

किनवट : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय , गोकुंदा येथील सखी मतदान केंद्रास भेट प्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली , तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर व महिला मतदान अधिकारी


किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघातर्गत येणाऱ्या किनवट विधानसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. हिंगोली लोकसभा मतदार संघातील  किनवट विधानसभेत सर्वाधिक  65. 86 % मतदान झाले.

          विधानसभा मतदार संघात 330 मतदान केंद्रावर शुक्रवारी (ता.26) निर्भय, मुक्त वातावरणात, शांततेत सुरळीत मतदान पार पडले. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाख 38 हजार 536 पैकी 93 हजार  655 पुरुष, 1 लाख 30 हजार 578 पैकी 83 हजार 601 महिला, 12  पैकी 02 इतर (तृतीय पंथी) मतदारांनी अशा एकूण 2 लाख 69 हजार 126 मतदारांपैकी 1 लाख 77 हजार 258 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. 

          येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या चार मतदान केंद्रापैकी एक दिव्यांग मतदान केंद्र व सर्व महिला मतदान अधिकारी असलेलं एक सखी मतदान केंद्र होतं. यालाच पिंक बुथ म्हणतात. हे मतदान केंद्र संपूर्ण गुलाबी रंगात रंगविलेलं होतं. येथे गुलाबी फुग्यांची भव्य कमान, मतदार जागृती रांगोळी, भिंती गुलाबी, टेबल क्लॉथ  गुलाबी, महिला मतदान अधिकारी यांनी गुलाबी फेटे बांधून गुलाबी रंगाच्या साड्या  परिधान केल्या होत्या. येथे मतदारांना येण्यासाठी गालिछे अंथरले होते. हे केंद्र शुद्ध थंड पिण्याचे पाणी, रॅम्प व व्हील चेअर अशा सुविधांनी परिपूर्ण होते. येथे बिस्किट देऊन मतदाराचे स्वागत करण्यात आले. हे केंद्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.

किनवट :  महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील महिला मतदान केंद्रात (सखी पिंक बुथ ) आलेल्या महिला मतदाराचे बिस्किट देऊन स्वागत करतांना मतदान केंद्राध्यक्ष मायावती देवतळे


      मतदार संघातील काही मतदान केंद्रावर मतदानापूर्वी व प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान यंत्र संच, तर कुठे एकल मतदान युनिट , व्हीव्हीपॅट , बॅटऱ्या बदलण्यात आल्या. ह्या किरकोळ तांत्रिक बाबी वगळता सर्वत्र सुरळीपणे मतदान पार पडले.

          शुक्रवारी (ता.26) पहाटे 2.30 वाजता झोन निहाय नियुक्त सर्व क्षेत्रिय अधिकारी, मास्टर ट्रेनर व राखीव इतर मतदान अधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा येथील स्ट्राँग रूम येथून राखीव मतदान यंत्रे व बॅटरी संच घेऊन आपापल्या क्षेत्रात रवाना झाली. 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातर्गत 83-किनवट विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी (ता.26) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 330 मतदान केंद्रावर 330 (राखीव 55) मतदान यंत्राद्वारे निर्भय, निःपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी 801 पोलिस अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या तैनातीसह तीन हजार अधिकारी कर्मचारी यांचेसह सज्ज असलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कष्ट घेतले.  


-मेघना कावली (भाप्रसे)

सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,

 15 - हिंगोली, 83- किनवट

          


किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 38 हजार 536 पुरुष, 1 लाख 30 हजार 578 स्त्री व 12  ईतर असे एकूण 2 लाख 69 हजार 126 मतदार आहेत. 330 मतदान केंद्रापैकी महात्मा फुले विद्यालय गोकुंदा येथे एक महिलांसाठी व एक दिव्यांगासाठी आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे एक महिला  व एक युवक  मतदारांसाठी असे 4 स्वतंत्र  मतदान केंद्र होते. दिव्यांगासाठीच्या सुलभ निवडणुका अंतर्गत तिथे सर्व सुविधा उपलब्ध केल्या होत्या. 7  संवेदनशील मतदान केंद्र व 7 शॅडो मतदान केंद्र होती. येथे केंदीय राखीव दल तैनात केले होते. तसेच 14 सूक्ष्म निरीक्षक होते. या केंद्रासह 165  मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया (मतदान अधिकारी तीन पर्यंतची) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन थेट प्रक्षेपित केली होती.

किनवट : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील सखी मतदान केंद्रात नायब तहसीलदार मोहम्मद रफीक महोम्मद बशिरोद्दीन यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी तेथील चारही मतदान केंद्राच्या बीएलओ                औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयातून गुरूवारी (ता.25) सहायक निवडणूक अधिकारी  मेघना कावली, तहसिलदार (किनवट) डॉ. शारदा चौंडकर, तहसिलदार (माहूर ) किशोर यादव  यांनी जीपीएस यंत्रणा बसविलेल्या एस.टी. महामंडळाच्या 38 बसेस, 10 स्कूल बसेस, 53 जीप आदी  वाहनाद्वारे मतदान पथके रवाना केली होती.  


किनवट : येथील मतदान केंद्र क्रमांक 200 कॉस्मॉपॉलिटन विद्यालय, गंगानगर येथे मतदानाचा हक्क बजावण्या साठी आलेल्या तृतीयपंथी मतदारा समवेत क्षेत्रिय अधिकारी सुभाष राठोड , मास्टर ट्रेनर रमेश मुनेश्वर , बीएलओ राजू भातनासे , राजू जोशी

                जिल्ह्यातील ईतर विधानसभा मतदारसंघातून येथे आलेल्या 376 मतदान केंद्राध्यक्ष, 376 प्रथम  मतदान अधिकारी व 376 इतर मतदान अधिकारी एक व  376 इतर मतदान अधिकारी दोन अशा एकूण एक हजार पाचशे छप्पन्न मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक चालक तथागत पाटील यांच्या साथीने एलईडी वॉलवर  पॉवर पॉईंट प्रझेंटेशन द्वारे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार (निवडणूक)  मुगाजी काकडे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. दुसऱ्या सत्रात स्वामी मल्लीकार्जून,  ग.नु. जाधव, रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर , सारंग घुले आदींसह सर्व 37 मास्टर ट्रेनर्स यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले. 


                  चोख पोलिस बंदोबस्त


उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाच्या वतीने मतदानासाठी  पोलिस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक असे एकूण 22 अधिकारी , 488 पोलिस कर्मचारी (स्त्री -पुरुष), 291  होमगार्ड, 1 सेक्शन एस.आर.पी.एफ. (112 जवानांचा चमू ) यांच्या चोख पोलिस बंदोबस्तासह 23 वाहने  उपलब्ध केली होती.     शुक्रवारी (ता.26) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून 33 उमेदवारांचे भवितव्य 330 मतदान यंत्रात बंद केले. ही यंत्रे व इतर अहवाल संकलनाचे काम पहाटे चार वाजेपर्यंत चालले. त्यानंतर सर्व मतदान यंत्रांच्या मोहोरबंद पेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत महाकार्गोत नेऊन हिंगोली येथील लिंबाळा (मक्ता) येथील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या स्ट्राँगरूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या. यावेळी जनरल  निवडणूक निरिक्षक एम.एस. अर्चना , निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांची उपस्थिती होती. आता ही स्ट्राँग रूम मतमोजणीसाठी 4 जून रोजीच उघडण्यात येणार आहे .

किनवट : येथील जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूल मतदान केंद्रावर शहाण्णव वर्षाच्या  वयोवृद्ध महिला मतदार सहारा मनसब खान यांनी मतदानाचा हक्क बजावला

              

        गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव (किनवट) व  सुरेश कांबळे (माहूर), कुलदीप यादव यांच्या समन्वयात सर्व फिरते व स्थानिक पथक, जगदीश पऱ्हाड यांच्या समन्वयात 80 सहायक व क्षेत्रिय अधिकारी, स्वीप कक्ष प्रमुख ज्ञानोबा बने तसेच नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, व्ही.पी. राठोड , अनिता कोलगणे , राजकुमार राठोड , केलास जेठे आदिंसह संदीप कदम , प्रकाश टारपे , के.डी. कांबळे, डी.सी. भुरे , नितीन शिंदे, व्ही.टी. सूर्यवंशी, एस.पी. जुंकटवार, गोविंद पांपटवार, संदीप पाटील , प्रभू पानोडे , संतोष मुपडे आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई व कोतवाल आदिंनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News