बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात यावी; तेलंगाणा मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, May 8, 2024

बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात यावी; तेलंगाणा मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

 निर्मल (तेलंगाणा) : बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात यावी असे मुख्यमंत्री यांना द्यावयाचे निवेदन बौध्द महार महामंडळ व बौध्द प्रश्नांवर  नुकत्याच झालेल्या येथील सभेत पंचायत राज , महिला व बालविकास मंत्री यांना  देण्यात आले.

        निर्मल जिल्ह्यातील निर्मल टाऊन येथील मारुती इन हॉटेल मध्ये  तेलंगाणा राज्याच्या पंचायत राज , महिला व बालविकास मंत्री  धनसारी अनुसया सीथाक्का यांच्या अध्यक्षतेखाली राज्य व जिल्हा विभागाची खुली बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी बौध्द महार महामंडळ व बौध्द प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. 

       यावेळी बौद्ध महामंडळाचे पदाधिकारी यांनी असे निवेदन दिले की, राज्य शासनाच्या वतीने बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात यावी , या आमच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री महोदया पर्यंत पोहचवावे.

         यावेळी बोलतांना राज्याच्या मंत्री धनसारी अनुसया सीथाक्का अशा म्हणाल्या की , आपल्या सर्व मागण्या ह्या मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील , तसेच माननीय मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी या विषयी नक्कीच सभागृहात बोलतील असेही आश्वासन त्यांनी दिले.

         यावेळी उत्तर तेलंगणा प्रदेशाध्यक्ष गौरवदाळे प्रभाकर, उत्तर तेलंगणा प्रदेश सरचिटणीस प्रज्ञाकुमार रत्नझाडे, प्रदेश उपाध्यक्ष नारायण वाघमारे, आदिलाबाद जिल्हाध्यक्ष विठ्ठल बुक्ते, उपाध्यक्ष भरत गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, खजिनदार कांताराव वाघमारे, संघटन सचिव रामदास भालेकर, रामदास तांबे आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News