उमरखेड (यवतमाळ) : येथील क्रीडा संकुलात कोमल डान्स स्टुडिओ तर्फे आयोजित फॅशन शो अतिशय भव्य अशा प्रतिसादाने पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. व्यवहारे, पुष्पा सोनटक्के ,पत्रकार सविता चंद्र हे उपस्थित होते. गणेश भराडे यांनी परिक्षकांची भूमिका चोख बजावली.
मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कोमल डान्स स्टुडिओ च्यावतीने हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रथम क्रमांक (रोख रक्कम 1500 रु. ) सायली शिंदे हिने पटकावला. तसेच दुसरा क्रमांक (रोख रक्कम 1000 रू.) परि कळलावे हिने आणि तिसरा क्रमांक (700 रु. ) मनस्वी हिने पटकावला. नित्या शिंदे यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. याबरोबर मुलांनी त्यांच्या फॅशन शोसाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाची वेशभूषा केल्यामुळे प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
उमरखेड परिसरातील पालकांनी दिलेल्या भरघोस अशा प्रतिसादामुळे कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला. स्वाती धामणकर यांनी सूत्रसंचालन केले. सोबतच सहाय्यक म्हणून खुशी घासे होती. फॅशन शो कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजिका कु. कोमल सोनटक्के यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment