महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंद्याचा 10 वीचा सेमी इंग्रजीचा 100 व मराठी माध्यमाचा 98.78 टक्के निकाल ; 99 % गुण घेऊन प्रीति जनार्धन दुधमल तालुक्यातून प्रथम #विज्ञान व गणित विषयात 100 पैकी 100 घेणारे प्रत्येकी 5 विद्यार्थी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, May 27, 2024

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंद्याचा 10 वीचा सेमी इंग्रजीचा 100 व मराठी माध्यमाचा 98.78 टक्के निकाल ; 99 % गुण घेऊन प्रीति जनार्धन दुधमल तालुक्यातून प्रथम #विज्ञान व गणित विषयात 100 पैकी 100 घेणारे प्रत्येकी 5 विद्यार्थी

  किनवट : तालुक्यातील गोकुंद्याच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा दहावीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के व मराठी माध्यमाचा 98.78 टक्के लागला असून सेमी इंग्रजी माध्यमातून 99 टक्के गुण घेऊन प्रीति जनार्धन दुधमल ही विद्यार्थिनी शाळेतून तसेच तालुक्यातून सर्वप्रथम आली आहे. समीक्षा प्रशांत डवरे (98.8%) व स्नेहल दत्ता कांबळे (98.8%) द्वितीय व शितल नामदेव चाकुरे ((97.8% ) तृतीय तसेच मराठी माध्यमातून प्रतिक्षा राहूल पारधे (93.20 %) प्रथम, जयश्री विजय कवडे (92 %) द्वितीय व पल्लवी अरविंद जाधव (91.60%) तृतीय आली आहे. या विद्यालयाची अशी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत मुलींनी यशाची बाजी मारल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

       महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातून इंग्रजी माध्यमात एकूण परीक्षेत बसलेल्या 241 विद्यार्थ्यांपैकी 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100 टक्के निकाल लागला आहे यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 73 विद्यार्थी , 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 133 विद्यार्थी , 60 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 31 विद्यार्थी व  द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे चार विद्यार्थी आहेत. तसेच गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण घेणारे पाच विद्यार्थी व  विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे पाच विद्यार्थी आहेत.

     बरोबर या विद्यालयातील मराठी माध्यमातून परीक्षेस बसलेल्या 165 विद्यार्थ्यांपैकी 163 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.78% निकाल लागला आहे. यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे सात विद्यार्थी , 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 96 विद्यार्थी, 60 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 53 विद्यार्थी व  द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे 37 विद्यार्थी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातून परिक्षेस बसलेल्या 406 विद्यार्थ्यांपैकी 404 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल  99.50%  लागला आहे.

       उत्तुंग भरारी घेणाऱ्या या यशवंताचे मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, उपमुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, पर्यवेक्षक किशोर डांगे, सुभाष सूर्यवंशी यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

         सेमी इंग्रजी माध्यमातील गुणवंत : पल्लवी उत्तम गाव अत्रे (97.6%) , प्रिया गणेश वंजारे (97%) , नेहा नितीन जाधव( 96.8%), प्राप्ती फुलाजी भोंगाळे (96.6%) , समीक्षा संजय तलवारे (96.4%) , दिशांत माधव मुंडकर (96.4%), अक्षय सुंदर पाळवदे (96.4%) , वेदिका बिबीशन सांगळे (96%), स्नेहा दिलीप कोल्हे (96%), गोविंद राजाराम कदम (96%) , स्नेहल संजय चव्हाण (95.8% ), नंदिनी ज्ञानोबा दुदमल (95.8%) , पियुष राहुल राठोड (95.8%) , उत्कर्ष सुभाष वाकोडे (95.4%) , स्नेहा सुनील मुंडे (95.2%) , तनुजा तुकाराम जाधव (95.2%), विघ्नेश बालाजी पोपुलवाड( 95.2%) , अक्षरा आनंद किसले (95.2%) प्राजक्ता उत्तमराव भुजबळे (95%).

           विज्ञान व गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे : भागवत राजू  राठोड , प्रीती जनार्दन दुधमल व पियुष राहुल राठोड.  विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण घेणारे : तनुजा तुकाराम जाधव, अक्षरा आनंद खिसले. गणित विषयात शंभर पैकी 100 गुण घेणारे : पल्लवी उत्तम गावत्रे अक्षय सुंदर पाळवदे. मराठी माध्यमातील यशवंत : साक्षी विनोद जाधव (91.40%), शिवानी संजय चव्हाण (90.20%), सौंदर्य अरविंद वाठोरे ( 90.20%) व  नेहा ओम प्रकाश जाधव (90%)


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News