भगवान मुनेश्वर यांनी श्रामणेर बौद्धाचार्य दीक्षा घेऊन धम्म चळवळीत स्वतःला दिले झोकून - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 27, 2024

भगवान मुनेश्वर यांनी श्रामणेर बौद्धाचार्य दीक्षा घेऊन धम्म चळवळीत स्वतःला दिले झोकून

 



किनवट : तालुक्यातील कोठारी (चि.) येथील भारतीय बौध्द महासभा शाखेचे सरचिटणीस भगवान कोंडीबा मुनेश्वर यांनी नांदेड येथील  प्रशिक्षण शिबीरात श्रामणेर  बौद्धाचार्य  दीक्षा घेऊन धम्म चळवळीत स्वतःला झोकून दिल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
     नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट नांदेड येथे गुरुवारी ( ता.9 मे ) ते शनिवारी (ता. 18 मे 2024 ) या कालावधीत भारतीय बौध्द महासभा शहर शाखा नांदेड उत्तर, तालुका शाखा  नांदेड उत्तर आणि जिल्हा शाखा नांदेड उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवशीय श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर  आयोजित करण्यात आले होते.
          किनवट तालुक्यातील कोठारी (चि.) येथील भारतीय बौध्द महासभा शाखेचे सरचिटणीस भगवान कोंडीबा मुनेश्वर यांनी या प्रशिक्षण शिबीरात श्रामणेर  बौद्धाचार्य  दिक्षा घेतली होती. यावेळी त्यांचे दिक्षित नाव कश्यप ठेवण्यात आले होते. श्रामणेर भगवान मुनेश्वर यांचे भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर व भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवटच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून पुढील धम्मकार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News