ऍड.चंद्रशेखरभाई आझाद लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल किनवटमध्ये जल्लोष - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, June 5, 2024

ऍड.चंद्रशेखरभाई आझाद लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल किनवटमध्ये जल्लोष

 किनवट : उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघातून आझाद समाज पार्टीचे व भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बहूजन नेते अ ऍड. चंद्रशेखरभाई आझाद लोकसभा निवडणूकीत  प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.
      भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.4 जून )  सायं.7.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले व विजयाचा जल्लोष साजरा केला. ऍड. चंद्रशेखरभाई आझाद हे 5,12,552 अशा प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे ओम कुमार यांचा पराभव त्यांनी केला. ओम कुमार यांना 3,61,079 इतकी मते मिळाली. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचे पक्ष व संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.   
      या विजयी जल्लोषात सामाजिक कार्यकर्ते अभय नगराळे, ऍड.सम्राट सर्पे, सुगत नगराळे, किरण कहाते, आदित्य कयापाक, प्रतिक लढे, राहुल करमकार, मंगेश कुंभारे, सुबोध कांबळे, सुमित शेंद्रे, क्षितीज मुनेश्‍वर, योगेश भवरे, निवेदक कानिंदे, शरण लोखंडे, अभिषेक भगत, अनिकेत भरणे, विपीन पवार, राजू पाटील, प्रज्वल ओंकार, सोज्वळ ओंकार आदींसह अनेकांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News